• Home
  • »
  • News
  • »
  • crime
  • »
  • मृत्यूपूर्वीची अखेरची सेल्फी: 8 महिन्यांच्या बाळासमोर विवाहितेची आत्महत्या

मृत्यूपूर्वीची अखेरची सेल्फी: 8 महिन्यांच्या बाळासमोर विवाहितेची आत्महत्या

आदल्या दिवशी पती आणि बाळासोबत (Husband and Baby) सेल्फी घेऊन दुसऱ्या दिवशी विवाहितेनं आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे.

  • Share this:
    जयपूर, 10 ऑगस्ट : आदल्या दिवशी पती आणि बाळासोबत (Husband and Baby) सेल्फी घेऊन दुसऱ्या दिवशी विवाहितेनं आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. पती कामानिमित्त बाहेर असताना आपल्या 8 महिन्यांच्या बाळासमोर विवाहितेनं आत्महत्या केली. पतीच्या आवडीच्या साडीची किनार कापून त्याचा वापर करून तिनं गळफास घेतला. अशी घडली घटना राजस्थानमधील माधवगंजमध्ये राहणाऱ्या सत्येंद्र कुशवाह यांचं अडीच वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांना 8 महिन्यांची एक मुलगीही होती. आत्महत्येच्या एक दिवस अगोदर सत्येंद्र आणि बाळासह तिने सेल्फीदेखील घेतला होता. आदल्या दिवसापर्यंत ती एकदम खूश होती, असं सत्येंद्र याचं म्हणणं आहे. मात्र त्या रात्री घेतलेला तो सेल्फी तिच्या आयुष्यातील अखेरचा सेल्फी ठरला. मंगळवारी सत्येंद्र कामानिमित्त बाहेर गेले असताना साडीची किनार कापून त्याचा गळफास तिने तयार केला. बाळासमोर तिने स्वतःला गळफास लावून घेतला. तिचं बाळ बराच वेळ रडत असल्यामुळे शेजाऱ्यांनी चौकशी करण्यासाठी दरवाजा ठोठावला, तेव्हा आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनी सत्येंद्र यांना फोन केला आणि पोलिसांनाही या घटनेची कल्पना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी बाळ रडत असून त्याच्या आईनं गळफास घेतल्याचं दिसून आलं, अशी बातमी 'दैनिक भास्कर'ने दिली आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. हे वाचा -जन्मदाती आईचं झाली वैरीण, अभ्यास करत नसल्याच्या रागातून 3 वर्षांच्या मुलाचा खून आत्महत्येचं कारण अस्पष्ट आपली पत्नी खूश होती आणि आपली कधीही भांडणं झाली नव्हती, अशी प्रतिक्रिया सत्येंद्र यांनी दिली आहे. तिनं आत्महत्येपूर्वी कुठलीही चिठ्ठी किंवा इतर संदेश दिला नसल्यामुळे तिच्या आत्महत्येमागे नेमके काय कारण असावे, याचा पोलीस तपास करत आहेत. मात्र सध्या तरी पोलिसांना काहीही कारण समजू शकलेले नाही.
    Published by:desk news
    First published: