मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

घरच्यांना समजले प्रेमसंबंध अन्... सांगलीत नर्सनं उचललं धक्कादायक पाऊल

घरच्यांना समजले प्रेमसंबंध अन्... सांगलीत नर्सनं उचललं धक्कादायक पाऊल

आम्रपाली सतीश कांबळे असं आत्महत्या करणाऱ्या 20 वर्षीय परिचारिकेचं नाव आहे. (फोटो- लोकमत)

आम्रपाली सतीश कांबळे असं आत्महत्या करणाऱ्या 20 वर्षीय परिचारिकेचं नाव आहे. (फोटो- लोकमत)

Suicide in Sangli: सांगली जिल्ह्यातील मिरज याठिकाणी एका 20 वर्षीय नर्सनं विषारी इंजेक्शन (Toxic injection) घेऊन आत्महत्या (Nurse Suicide) केली आहे.

  • Published by:  News18 Desk

सांगली, 11 ऑगस्ट: सांगली (Sangli) जिल्ह्यातील मिरज (Miraj) याठिकाणी एका 20 वर्षीय नर्सनं विषारी इंजेक्शन (Toxic injection) घेऊन आत्महत्या (Nurse Commits Suicide) केली आहे. संबंधित नर्स एका खाजगी रुग्णालयात परिसचारिका म्हणून कार्यरत होती. दरम्यान मंगळवारी सायंकाळी तिने विषारी इंजेक्शन घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. नर्सनं प्रेमप्रकरणातून (Love Affair) ही आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे. पण पोलिसांना घटनास्थळी सुसाइड नोट आढळली असून या नोटमधून आत्महत्येच्या नेमक्या कारणाचा खुलासा होण्याची शक्यता आहे.

आम्रपाली सतीश कांबळे असं आत्महत्या करणाऱ्या 20 वर्षीय परिचारिकेचं नाव आहे. मंगळवारी सायंकाळी आम्रपालीनं विषारी इंजेक्शन घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. मिरजेतील मराठे मिल चाळ परिसरातील रमामाता आंबेडकर कॉलनीत ही घटना उघडकीस आली आहे. आम्रपालीनं विषारी इंजेक्शन घेतल्याची माहिती कुटुंबीयांना कळल्यानंतर, नातेवाईकांनी त्वरित तिला उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच तिचं निधन झालं आहे.

हेही वाचा-वडिलांसोबत उपचारासाठी आली अन्...; 24 वर्षीय तरुणीसोबत डॉक्टरचं विकृत कृत्य

खरंतर, मृत आम्रपाली हीच मागील काही दिवसांपासून आपल्या ओळखीच्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू होते. याची माहिती आम्रपालीच्या कुटुंबीयांना मिळाली होती. पण कुटुंबीयांनी दोघांच्या लग्नाला होकार दिला होता. असं असूनही आम्रपालीनं मंगळवारी विषारी इंजेक्शन घेत आत्महत्या केली आहे. सर्वकाही ठिक असताना आम्रपालीनं आत्महत्या केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा-व्याजाच्या पैशांसाठी महिलेचा छळ; बंदुकीचा धाक दाखवत सावकाराकडून अनेकदा बलात्कार

आत्महत्येचं अधिकृत कारणाचा खुलासा पोलिसांकडून अद्याप करण्यात आला नाही. पोलिसांना घटनास्थळी सुसाइड नोट मिळाली आहे. यातून आत्महत्येचं नेमक्या कारणाचा खुलासा होण्याची शक्यता आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Sangli, Suicide