JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / कोरोनाचा असाही फटका! बिग बींसोबत काम केलेली तरुणी झाली बेरोजगार; मोमोज विकून काढतेय दिवस

कोरोनाचा असाही फटका! बिग बींसोबत काम केलेली तरुणी झाली बेरोजगार; मोमोज विकून काढतेय दिवस

सुचिस्मिता राउतराय (Suchismita Routray) ओडीसातील कटक याठिकाणी आपल्या आईसोबत राहते. ती घरात एकुलती एक कमाई करणारी असून तिच्या वडिलांचं निधन झालं आहे. अशा परिस्थितीत तिच्याकडे मोमोज (Sell momos) विकण्याशिवाय पर्याय नव्हता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 मार्च: 2020 हे वर्ष अनेकांसाठी खूपच त्रासदायक ठरलं आहे. कोरोना विषाणूचा (Coronavirus) सर्वात मोठा फटका जगभरातील तरुणांना बसला आहे. कोरोना काळात कोणत्याही प्रकारची रोजगार निर्मिती झाली नाही. उलट अनेकांचे रोजगार गेले. त्यामुळे अनेकांना आर्थिकदृष्ट्या कर्जबाजारी व्हाव लागलं आहे. याचा फटका चित्रपट विश्वात काम करणाऱ्या नवोदित कलाकारांनाही बसला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यांना चित्रपट विश्व सोडून आपल्या स्वप्नांचा चुराडा करून परत आपल्या गावी परतावं लागलं आहे. त्यामुळे अनेकांना बेरोजगारीचा सामना करावा लागला आहे. तर काहींनी उदरनिर्वाहासाठी वेगळ्या वाटा चोखाळल्या आहेत. महिला कॅमेरा पर्सन सुचिस्मिता राउतरायसोबत (Suchismita Routray) असंच काहीसं घडलं आहे. सुचिस्मिताने एकेकाळी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि वरुण धवन यांसारख्या बड्या कलाकारांसोबत काम केलं आहे. पण कोरोना विषाणूचा तिला जबरदस्त फटका बसला आहे. त्यामुळे तिला आपल्या स्वप्नांना मूठमाती देवून पुन्हा आपल्या गावी परतावं लागलं आहे. आज तिला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोमोज विकावी लागत आहेत. आपली स्वप्न साकार करण्यासाठी ओडीसाहून मुंबईला गेलेल्या सुचिस्मिताला तिची स्वप्नं साकार होण्यापूर्वीच परत जावं लागलं आहे. महिला कॅमेरापर्सन असणाऱ्या सुचिस्मिताला कोरोनामुळे कॅमेरा सोडून हाती कढई आणि झारी घ्यावी लागली आहे. आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी तिला आपलं करीयर सोडावं लागलं आहे. सुचिस्मिता ओडीसातील कटक याठिकाणी आपल्या आईसोबत राहते. ती घरात एकुलती एक कमाई करणारी असून तिच्या वडिलांचं निधन झालं आहे. अशा परिस्थितीत तिच्याकडे मोमोज विकण्याशिवाय पर्याय नव्हता. एकेकाळी बड्या चित्रपटांमध्ये कॅमेर्‍यामागं आपली कौशल्याची चमक दाखवणारी सुचिस्मिता आता मोमोजची विक्री करून दिवसाला 300 ते 400 रुपये कमावत आहे. देशात लॉकडाऊन होण्यापूर्वी तिचं आयुष्य रुळावर जात होतं. तिला चित्रपटात कामही मिळत होतं आणि नवीन संधीही चालून येत होत्या. परंतु एका विषाणूनं तिच्या स्वप्नांचा घात करून तिचं आयुष्य अंधकारमय करून टाकलं आहे. हे ही वाचा - ‘काम मागितल्यास करतात अपमान’; रश्मी देसाईनं केली बॉलिवूडची पोलखोल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुचिस्मिता राउतरायनं सांगितलं की, तिने आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ओडीसा चित्रपट सृष्टीत काम करायला सुरुवात केली. त्यानंतर 2015 मध्ये तिने आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई गाठली. याठिकाणी सहा वर्षे असिस्टंट कॅमेरा पर्सन म्हणून काम केलं, पण कोरोनानं सर्वकाही बदलून टाकलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या