JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / साप पकडता पकडता विद्युत जामवालच्या हातात आलं असं काही; VIDEO पाहून बसेल शॉक

साप पकडता पकडता विद्युत जामवालच्या हातात आलं असं काही; VIDEO पाहून बसेल शॉक

विद्युत जामवालच्या (Vidyut Jammwal) या व्हिडीओची सुरुवात जितकी उत्कंठा वाढवणारी आहे, क्लाइमॅक्स तितकाच मजेशीर आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 नोव्हेंबर : अॅक्शन हिरो विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) आपल्या स्टंटने सर्वांना धक्के देतच असतो. आता त्यानं चक्क सापाला पकडण्याची डेअरिंग केली. साप पकडतानाचा व्हिडीओ त्याने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओत साप पकडता पकडता विद्युतच्या हातात भलतंच काही तरी आलं. जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल. विद्युत जामवालनं साप पकडताना आपला व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडीओत पाहू शकतात विद्युत एका जंगालत झाडाच्या खाली बसला आहे. तिथं एक सापाचं बिळ आहे आणि त्यातून तो सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. आजूबाजूला अगदी धीरगंभीर वाचावरण आहे. विद्युत फक्त एकटाच नाही. तर त्याच्या आजूबाजूला इतर लोकही आहेत, जे त्याला सूचना देत आहेत किंवा इशारा करत आहेत.

विदयुत सापाला पकडण्यासाठी खूप धडपड करतो, त्याच्या प्रयत्नाला यशही मिळतं आणि त्याच्या हातात जे काही तुम्हाला दिसेल ते पाहून आता हसावं की रडावं असंच वाटेल. या व्हिडीओची सुरुवात जितकी उत्कंठा वाढवणारी आहे, त्याचा क्लाइमॅक्स तितकाच मजेशीर आहे.  विद्युतच्या हातात कोणता साप नाही तर त्याचा बेल्ट तुम्हाला पाहायला मिळेल. विद्युत हा बेल्ट झटकतो आणि आपल्या कमरेभोवती लावतो. हे वाचा -  आयुष्मान खुरानाने केली किंग खान शाहरुखची कॉपी, VIDEO पाहून चाहते म्हणाले… विद्युत जामवालची फिल्म खुदा हाफिज काही दिवसांपूर्वीच रिलीज झाली होती. एक उत्कृष्ट अभिनेत्यासह तो मार्शल आर्टिस्ट आणि स्टंट परफॉर्मरदेखील आहे. फक्त बॉलिवूडच नाही तर टॉलीवूड आणइ कॉलीवूडमध्येही त्यानं काम केलं आहे. याशिवाय दो गाने तुम्ही दिल्लगी, गल बन गई अशी त्याची गाणीही हिट झाली. विद्युतने झी सिने अवॉर्ड. आयफा आणि फिल्मफेअर अवॉर्डनंही सन्मानित करण्यात आलं आहे. हे वाचा -  गोव्यात पूनम पांडेनं शूट केला NUDE VIDEO; पोलिसांनी ठोकल्या बेड्या मिळालेल्या माहितीनुसार द रिचेस्ट या वेबसाईटवर अशा लोकांची यादी जारी करण्यात आली आहे, ज्यांच्याशी कुणी पंगा घेत नाही आणि या यादीत विद्युतचाही समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या