Home /News /entertainment /

आयुष्मान खुरानाने केली किंग खान शाहरुखची कॉपी, VIDEO पाहून चाहते म्हणाले...

आयुष्मान खुरानाने केली किंग खान शाहरुखची कॉपी, VIDEO पाहून चाहते म्हणाले...

आयुष्मान खुरानाने (Ayushmann Khurrana) किंग खान शाहरुख खानची (Shahrukh Khan) कॉपी करत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

  मुंबई, 05 नोव्हेंबर: अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) त्याच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने बॉलिवूड बादशाह शाहरुख खानची (Shahrukh Khan) ची कॉपी करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ त्याच्या आणि शाहरुखच्या चाहत्यांना देखील आवडला आहे. इन्स्टाग्रामवर आयुष्मानने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 2 नोव्हेंबर रोजी शाहरुखने त्याचा 55वा वाढदिवस साजरा केला. देशभरातील त्याच्या तमाम चाहत्यांनी शाहरुखला शुभेच्छा दिल्या होत्या. आयुष्मानने देखील त्याच्या खास शैलीत किंगखानला शुभेच्छा दिल्या. आयुष्मानने इन्स्टाग्रावर त्याचं पहिलंवहिलं Reel शाहरुखच्या वाढदिवशी पोस्ट केलं. यामध्ये त्याने शाहरुखच्या 'तुझे देखा तो ये जाना सनम' या व्हिडीओची कॉपी करत आहे. त्याने खूप कॉमिक अंदाजात यामध्ये परफॉर्म केलं आहे. त्यामुळे यावर आलेल्या कमेंट्समध्ये देखील चाहत्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
  View this post on Instagram

  My first reel. Had to be on Shah sir’s bday. #happybirthdaysrk 🎥 by @officialjuhiarora

  A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk) on

  यामध्ये शाहरुखची कॉपी करताना आयुष्मानने गिटार ऐवजी मच्छर मारायची रॅकेट वापरली आहे. त्यामुळे एका युजरने असे म्हटले आहे की, 'हा व्हिडीओ पाहून मुलीच नाही तर मच्छरही पळून जातील'. तर आणखी एका युजरने अशी कमेंट केली आहे की, 'जेव्हा तुम्ही चोर बाजारातून राहुलला घेऊन येता..' काहींनी त्याच्या स्टाइलचं कौतुक केलं आहे. आयुष्मानची सर्वात जवळची मैत्रिण अनेक चित्रपटात त्याची सहकलाकार असणाऱ्या भूमी पेडणेकरने देखील त्याच्या या व्हिडीओचं कौतुक करत असं म्हटलं आहे की, 'Best for the best'. (हे वाचा-'गुडूडू' नाही हे पात्र साकारण्याची होती ऑफर, अलीने मिर्झापूरसाठी दिला होता नकार) वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर आयुष्मान सध्या 'चंदीगड करे आशिकी' या मोस्ट अवेटेड सिनेमाचं शूटिंग करत आहे. त्याचं होम टाउन असणाऱ्य चंदीगडमध्येच या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Ayushmann Khurrana, Bollywood, Shahrukh khan

  पुढील बातम्या