पणजी, 05 नोव्हेंबर : वादग्रस्त कारणांसाठी सातत्याने चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री पूनम पांडेला (poonam pandey) पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एका व्हिडीओमुळे (video) पूनम पांडेला अटक करण्यात आली आहे. गोव्यात (goa) शूट केलेला तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी विरोधी पक्षाने सरकारवर टीकेची झोड उठल्यानंतर आज गोवा पोलिसांनी (goa police) पूनम पांडेला अटक केली आहे.
पूनम पांडेचा हा वादग्रस्त व्हिडीओ गोवा सरकारच्या पाटबंधारे खात्याच्या चापोली धरणावर शूट करण्यात आला. या व्हिडीओवर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. सध्या कोविडच्या काळात धरणावर जाण्यासाठी सामान्य माणसाला बंदी असताना अशा प्रकारच्या शूटिंगला कशी परवानगी दिली जाते, असा आक्षेप घेण्यात आला.
पूनम पांडेला उत्तर गोवा पोलिसांनी सिकरी येथील पंचतारांकित हॉटेलमधून अटक केली आहे. पोलिसांनी IPC 292 नुसार कारवाई केली आहे. पुढील तपासासाठी काणकोण येथे नेण्यात आलं आहे.
CM @DrPramodPSawant #SwayamPurna msg has been seriously taken by his Cabinet Colleagues.Earlier we had a Minister sharing Porn Videos ,Now we have another Minister whose department is involved in production of a Porn Video. Is @BJP4India promoting our state as #PornDestination ? https://t.co/kFHP3DTrhu
— Durgadas Kamat (@durgadasskamat) November 3, 2020
दरम्यान शूटिंगची परवानगी देणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष मुख्यमंत्री प्रमोद सावंत असल्यानं त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाने केली. या शिवाय या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणीही या पक्षाने आणि सामाजिक संस्थांनी केली आहे.
हे वाचा - रियानं 8 जूनला सुशांतचं घर का सोडलं? वकिलांनी केला मोठा खुलासा
दोन महिन्यांपूर्वी पूनम पांडे आपला पती सॅम बॉम्बेसह गोव्यात हनिमूनसाठी आली होती. त्यावेळी तिनं सॅमने आपल्याला मारहाण केली आणि विनयभंग केला अशी तक्रार गोव्याच्या काणकोण पोलिसात दिली होती. दरम्यान आता पूनम पांडेलाच अटक करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Goa, Poonam pandey