मुंबई, 26 सप्टेंबर : बॉलिवूड सध्या एनसीबीच्या रडारवर आहे. अनेक कलाकारांची नावे ड्रग केसमध्ये समोर आली आहेत. सध्या एनसीबीकडून अभिनेत्री दीपिका पादुकोणची (Deepika Padukone) चौकशी सुरू आहे. याप्रकरणी रकुल प्रीत सिंहची देखील चौकशी करण्यात आली आहे. तर श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) या अभिनेत्रींची नावं याप्रकरणी समोर आल्यानंतर त्यांची देखील चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान अशी माहिती मिळते आहे की, निर्माता-दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) याची देखील चौकशी होऊ शकते. त्याच्या एका पार्टीतील व्हिडीओ काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरून ही चौकशी होऊ शकते. 2019 मध्ये करण जोहरने एका पार्टीचा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यावेळी देखील हा व्हिडीओ खूप चर्चेत आला होता. त्याच्या राहत्या ठिकाणी ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. या व्हिडीओत दीपिका पादुकोण, शाहिद कपूर, वरुण धवन, मलायका अरोरा, अर्जून कपूर, विकी कौशल, रणबीर कपूर आणि इतर काही कलाकार दिसत होते. दरम्यान त्यावेळी देखील हे कलाकार पार्टीत ड्र घेत असल्याचे वेगाने पसरले होते. दरम्यान इंडिया टु़डे कॉनक्लेव्हमध्ये विकी कौशलने याबाबत स्पष्टीकरण दिले होते. सध्या बॉलिवूडमधील ड्रग प्रकरणाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने विकी कौशलचा हा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे.
त्याने असे म्हटले होते की, ‘तर त्यादिवशी असे झाले, करणने आम्हाला सर्वांना बोलावले. आम्ही त्याच्या घरी Chill करत होतो. त्या दिवसाच्या 3 दिवस आधी मी डेंग्यू आजारातून बरा झालो होतो. मी त्याआधी 10 दिवस घरी बसून होतो आणि त्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की तू आता काम करू शकतोस. पार्टीमध्ये तो व्हिडीओ बनवण्याआधी करणची आई तिथे होती आणि त्यांनी थोडं गंगाजळ आमच्यावर शिंपडलं. करण व्हिडीओ बनवत होता, पहिल्या व्हि़डीओमध्ये आम्ही खूप उत्साही होतो आणि चौथ्यामध्ये कंटाळलो होतो, नाकावर खाजवणे खूप नॉर्मल आहे, मला नव्हते माहित याचा अर्थ ड्रग्ज होतो.’ (हे वाचा- ‘माल’ घेतला नाही मग 12 वकिलांचा सल्ला कशासाठी? शर्लिनचा दीपिकाला तिखट सवाल) विकीने पुढे म्हटले की, पार्टीच्या दुसऱ्या दिवशी तो अरुणाचल प्रदेशमध्ये गेला होता आणि 4 दिवस त्याने इंटरनेट सुरू केले नव्हते. जेव्हा तो परतला तेव्हा व्हायरल झालेल्या गोष्टी धक्कादायक होत्या. त्याने यावेळी करण जोहरला पाठिंबा देत असेही म्हटले होते की, जर तिथे सर्वजण ड्रग घेत होते तर असा व्हिडीओ करण का अपलोड करेल? व्हायरल झालेला हा तो व्हिडीओ-
दरम्यान निर्माता करण जोहर याने देखील या पार्टीसंदर्भात एक अधिकृत स्टेटमेंट त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. त्याने असे म्हटले आहे की, ‘मीडियामध्ये अशी चुकीची बातमी पसरवली जात आहे की, 28 जुलै रोजी मी होस्ट केलेल्या पार्टीमध्ये ड्रग्ज वापरण्यात आले. 2019 मध्ये देखील मी हे स्पष्ट केले होते की सर्व आरोप खोटे आहेत. पार्टीमध्ये कोणत्याही प्रकारे ड्रग वापरण्यात आले नव्हते.’