मुंबई, 26 सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूत मृत्यू (Sushant Singh Rajput Death Case) प्रकरणात ड्रग अँगल समोर आल्यानंतर एनसीबीच्या रडारवर बॉलिवूडमधील अनेक सेलेब्स आहेत. एनसीबी आज दीपिका पादुकोणची चौकशी करणार आहे. या प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वीच अभिनेत्रीचा पती अभिनेता रणवीर सिंगने एनसीबीकडे अर्ज केल्याची माहिती मिळाली होती, त्यात त्यांने या चौकशीदरम्यान दीपिकासोबत राहण्याची परवानगी मागितली आहे. परंतु, त्यांना असा कोणताही अर्ज मिळाला नसल्याचे एनसीबीच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान याप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राने दीपिकावर उपहासात्मक टिका केली आहे. बॉलिवूडमधून समोर आलेल्या एका ड्रग चॅटमध्ये दीपिका पादुकोणचे नाव आल्यानंतर अभिनेत्री शर्लिन चोप्रा सतत बॉलिवूडमध्ये ड्रग्स कल्चरबद्दल स्टेटमेंट करत आहे. अलीकडेच तिने एक ट्विट केले जे खूप व्हायरल होत आहे. शर्लिन चोप्राने ट्वीटमध्ये लिहिले- ‘जर तू ‘माल’ घेतला नाहीत तर तुला 12 वकिलांचा सल्ला का घ्यावा लागला? जे सत्य बोलतात ते घाबरत नाहीत किंवा त्यांना पॅनिक अॅटॅक येत नाहीत. जेथे निर्भयता असते तेथे भीती वा भीती बाळगण्याचे स्थान नसते.’
यदि आप “माल” का सेवन नहीं करते हैं, तो 12 वकीलों के साथ सलाह मशविरा करने की ज़रूरत क्यों पड़ी???
— Sherlyn Chopra (शर्लिन चोपड़ा)🇮🇳 (@SherlynChopra) September 25, 2020
सच बोलने वालों को panic या anxiety attacks नहीं होते हैं..
जहाँ निडरता हो, वहाँ डर या भय के लिए कोई जगह नहीं होती है..
शर्लिनने दीपिकाला लक्ष केले आहे, कारण रणवीरने तिच्या चौकशीवेळी उपस्थित राहता यावे याकरता अर्ज केल्याची माहिती समोर आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार असे वृत्त समोर आले आहे की, ड्रग्ज प्रकरणी होणाऱ्या दीपिकाच्या चौकशीदरम्यान त्याठिकाणी उपस्थित राहण्याची परवानगी दीपिकाचा पती अर्थात अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याने एनसीबीकडे मागितली आहे. यासंदर्भात त्याने एनसीबीकडे अर्ज देखील दिला आहे. यामध्ये त्याने असे म्हटले आहे की, दीपिकाच्या चौकशीदरम्यान त्याने तिथे असणे आवश्यक आहे कारण तिला कधी कधी पॅनिक अॅटॅक येतात आणि भीती देखील वाटते. त्यामुळे त्याला दीपिकाबरोबर असण्याची परवानगी देण्यात यावी. (हे वाचा- VIDEO: सोशल मीडियानंतर आता मुंबईतील रस्त्यांवर #justiceforsushant चे पोस्टर्स) शर्लिन चोप्राने अनेक चॅनेल्सना मुलाखती दिल्या असून त्यात तिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तिने असे म्हटले आहे की, बॉलिवूड आणि इथल्या पार्ट्यांमध्ये ड्रग्जचा वापर केला जातो. कोलकाता नाईट रायडर्स विजयी झाल्यानंतर करण्यात आलेल्या एका पार्टीत स्टार्सच्या पत्नींना ड्रग्ज घेताना पाहिले असल्याचा तिने दावा केला आहे, जे पाहून तिला धक्का बसला होता असेही ती म्हणाली. (हे वाचा- पुन्हा एकदा व्हायरल झाले रश्मी देसाईचे PHOTOS, बोल्ड अंदाजावर चाहते फिदा ) यापूर्वी शर्लिन चोप्रा कास्टिंग काउचबद्दल खुलासा करून चर्चेत आली होती. शर्लिनने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की जेव्हा मी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले, तेव्हा अनेक चित्रपट निर्माते मला डिनरसाठी बोलावत असत, तेव्हा मला ही गोष्ट समजली नव्हती.