JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / बॉलिवूडला मोठा धक्का! प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शकाचं निधन

बॉलिवूडला मोठा धक्का! प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शकाचं निधन

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक तारिक शाह यांचं निधन झालं (Veteran Bollywood Actor-Director Tariq Shah Passes Away) आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 03 एप्रिल : बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक तारिक शाह यांचं निधन झालं (Veteran Bollywood Actor-Director Tariq Shah Passes Away) आहे. शनिवारी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीला धक्का बसला आहे. बॉलिवूड फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या सोशल मीडियावर तारिक यांच्या निधनाची बातमी दिली आहे. “दु:खद बातमी. कडवा सच टीव्ही सीरिअल आणि जनम कुंडली फिल्मचे अभिनेते आणि दिग्दर्शक तारिक शाह यांचं सकाळी निधन झालं. मुंबईतील खासगी रुग्णालया निधन झालं”, असं ट्वीट विरल भयानीने केलं आहे.

संबंधित बातम्या

तारिक शहा हे अभिनेत्री शोमा आनंद यांचे पती. त्या दोघांनाही एक मुलगी आहे.  त्यांना किडनीचा आजार होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. ते डायलेसिसवर होते. हे वाचा -  NCB च्या छाप्याआधीचं अभिनेता फरार; लोखंडवालात सुरू होतं ड्रग्ज पॅकिंग बहार आने तक, मुंबई सेंट्रल, एहसास, गुमनान है कोई अशा फिल्मसाठी तारिक यांना ओळखलं जायचं. त्यांनी जनम कुंडली, बहार आने तक अशा फिल्म आणि कडवा सच ही टीव्ही सीरिअल दिग्दर्शित केली. निर्मितीचं कामही त्यांनी पाहिलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या