मुंबई, 03 एप्रिल : ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी मनोरंजन क्षेत्रातील एका पाठोपाठ एक सेलिब्रिटींची नावे समोर येत आहेत. अभिनेता एजाज खानच्या पाठोपाठ आणखी एका टीव्ही अभिनेत्याचं ड्रग्ज कनेक्शन आता समोर आलं आहे. गौरव दीक्षित असं या अभिनेत्याचं नाव असून, त्यानं थेट लोखंडवालामधील फ्लॅटमध्ये ड्रग्ज पॅकिंगची कंपनीच सुरू केल्याचं स्पष्ट झालं आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकानं त्याच्या फ्लॅटवर छापा टाकला मात्र, त्यापूर्वीच तो गर्लफ्रेंडसह फरार झाल्याची माहिती मिळाली आहे.
ड्रग्ज कनेक्शनचा तपास करताना NCB ला गौरव दीक्षित याचे नाव समोर आले होते. त्यानंतर NCB नं गौरव दीक्षित त्या लोखंडवाला मधील फ्लॅटवर छापा मारला. मात्र गौरवला कदाचित याबाबत आधीच माहिती मिळाल्यानं तो गर्लफ्रेंडबरोबर आधीच फरार झाला होता. गौरव फरार झाला असला तरी अंधेरीतील लोखंडवाला येथील त्याच्या फ्लॅटमधून मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आणि पॅकिंग मशीनसह इतर साहित्य मिळाले आहे. गौरवने या फ्लॅटवर ड्रग्ज पॅकिंगची कंपनीच सुरू केल्याचं त्यावरून स्पष्ट होत आहे.
वाचा - ‘तो मी नव्हेच….’; एजाज खानमुळं या अभिनेत्यावर होतोय ड्रग्ज घेतल्याचा आरोपएजाज खानकडून मिळाली माहिती
NCB नं ड्रग्ज केसमध्ये 30 मार्च रोजी बिग बॉस फेम अभिनेता एजाज खानला विमानतळावरून ताब्यात घेतलं होतं. सुमारे 8 तासांच्या चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून मिळालेल्या माहितीत गौरव दीक्षितचं नाव समोर आल्याची माहिती आहे. त्यानंतरच गौरवच्या फ्लॅटवर छापा टाकण्यात आला होता. एजाज खानचे ड्रग्ज सप्लायर शादाबबरोबर संबंध असल्याचं समोर आलं आहे. त्याला गेल्या आठवड्यातच 2 कोटींच्या ड्रग्जसह अटक करण्यात आली होती. गौरव दीक्षित याने काही चित्रपटांसह, टीव्ही मालिका आणि शॉर्ट फिल्ममध्ये अभिनय केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.