मुंबई**,** 12 फेब्रुवारी: फेब्रुवारी महिना सुरू झाला की तरुणाईला वेध लागतात ते व्हेलेंटाइन डे चे (Valentine’s Day). 14 फ्रेब्रुवारी हा दिवस संपूर्ण जगात व्हेलंटाईन डे अर्थात प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. परंतु दुदैवानं याच काळात अनेकांचे ब्रेकअप देखील होतात. मग या ब्रेकअपमुळे अनेक तरुण मंडळी नैराश्येत वगैरे देखील जातात. परंतु ब्रेकअपमुळे नैराश्येत जाणाऱ्या तरुणांसाठी अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) हिने काही खास टीप्स दिल्या आहेत. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अनन्याने व्हेलेंटाइन डेवर भाष्य केलं. त्यावेळी तिनं ब्रेकअप झालेल्या तरुणांना मूव्ह ऑन करण्यासाठी काही खास सल्ले दिले. (how to move on after breakup) स्वत:वर प्रेम करा – जो व्यक्ती स्वत:वर प्रेम करतो तोच दुसऱ्यावर प्रेम करू शकतो. त्यामुळे आधी स्वत:वर प्रेम करा. व्यायाम करा, सकस आहार घ्या, आपले छंद जोपासा. आनंदी राहील्यामुळे तुम्ही कधीही नैराश्येत जाणार नाही. मूव्ह ऑन करा – ब्रेक अप झाल्यानंतर दु:ख तर होतंच. पण ते दु:ख कवटाळून बसू नका. पुढे जा स्वत:चं लक्ष इतर कामांमध्ये गुंतवा. त्यामुळे ब्रेकअपमुळे मिळालेल्या आघातातून तुम्ही स्वत: सावरू शकाल. हे वाचा - ‘मी स्मिता पाटीलचा मुलगा आहे हे दाखवून देईन’, प्रतीक बब्बरनं आईसाठी केला ‘हा’ निश्चय स्वत:ला नवी संधी द्या – ब्रेक झालं म्हणून रुसून बसू नका त्याऐवजी व्हेलंटाईन डेचा आनंद घ्या. हा दिवस केवळ प्रेयसी किंवा प्रियकरासोबतच साजरा करायला हवा असा काही नियम नाही. तुमच्या आयुष्यात तुमचे आई-वडिल, नातेवाईक, मित्र मंडळी असे अनेक जण आहेत त्यांच्यासोबत हा दिवस साजरा करा. हे वाचा - ‘तू माझ्या पोटावर लाथ मारली’; फराह खान, शिल्पा शेट्टीचं झालं भांडण; पाहा VIDEO स्वत:ला एक संधी द्या. कारण ब्रेकअपला केवळ तुम्ही जबाबदार नसता.