• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'तू माझ्या पोटावर लाथ मारली'; शिल्पा शेट्टी आणि फराह खानचं झालं भांडण; पाहा VIDEO

'तू माझ्या पोटावर लाथ मारली'; शिल्पा शेट्टी आणि फराह खानचं झालं भांडण; पाहा VIDEO

शिल्पा शेट्टी आणि फराह खानमध्ये वाद झाला आणि पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा.

 • Share this:
  मुंबई, 11 फेब्रुवारी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ही बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. गेल्या काही काळात चित्रपटांपासून दूर असलेली शिल्पा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. आपल्या जबरदस्त फिटनेसमुळे चर्चेत असते. तिचे योगा आणि व्यायाम करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असतात. शिवाय मजेशीर व्हिडीओही ती शेअर करत असते. शिल्पाचा असाच एक गंमतीशीर व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. तो म्हणजे भांडणाचा. शिल्पानं हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खानसोबत (Farah Khan) गमतीशीर वाद-विवाद करताना दिसत आहे.
  फराह शिल्पावर जाहिरात चोरल्याचा आरोप करते. “शिल्पा तू माझ्या पोटावर लाथ मारली आहेस” अशी तक्रार ती करते. यावर शिल्पानं देखील "मी काय करू पापी पोटाचा प्रश्न आहे" असं म्हणत तिला गमतीशीर प्रत्युत्तर देते. हे वाचा - अरेरे! शूटिंग सोडून चालवावी लागतेय रिक्षा; अभिनेत्री जान्हवी कपूरवर आली अशी वेळ या व्हिडीओमध्ये शिल्पा लाल रंगाची साडी नेसून एका जाहिरातीचं चित्रीकरण करण्यासाठी सेटवर येते. "हे जाहिरातवाले तयार झाले की नाही?" असा ती आवाज देते. तेवढ्यात तिचा आवाज ऐकून तिथं फराह देखील येते. "शिल्पा ही जाहिरात पहिली मी करणार होते. तेवढ्यात तू माझ्या पोटावर लाथ मारलीस." असं म्हणत ती आपली नाराजी व्यक्त करते. शिल्पा देखील आपल्या पोटाकडे तिचं लक्ष वळवून "ही जाहिरात मला माझ्या या पोटामुळेच मिळाली आहे. चल आता ही जाहिरात आपण दोघं करूया" असं म्हणत ती वादावर पडदा टाकते. हे वाचा - अखेर कंगनाने घेतली माघार, अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी BMC कडे करणार अर्ज! "फराहने माझी जाहिरात चोरली", अशा आशयाची कॉमेंट लिहून शिल्पानं हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधील दोघांची जुगलबंदी प्रेक्षकांना विशेष आवडत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे काही तासांत 13 लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
  Published by:Mandar Gurav
  First published: