मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'मी स्मिता पाटीलचा मुलगा आहे हे दाखवून देईन', प्रतीक बब्बरनं आईसाठी केला ‘हा’ निश्चय

'मी स्मिता पाटीलचा मुलगा आहे हे दाखवून देईन', प्रतीक बब्बरनं आईसाठी केला ‘हा’ निश्चय

बॉलिवूड अभिनेता प्रतीक बब्बर (Prateik Babbar) हा नामांकित अभिनेते राज बब्बर आणि अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) यांचा मुलगा आहे. पण आपल्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो.

बॉलिवूड अभिनेता प्रतीक बब्बर (Prateik Babbar) हा नामांकित अभिनेते राज बब्बर आणि अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) यांचा मुलगा आहे. पण आपल्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो.

बॉलिवूड अभिनेता प्रतीक बब्बर (Prateik Babbar) हा नामांकित अभिनेते राज बब्बर आणि अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) यांचा मुलगा आहे. पण आपल्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो.

मुंबई, 11 फेब्रुवारी :  बॉलिवूड अभिनेता प्रतीक बब्बर (Prateik Babbar) आपल्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो. प्रतीक हा नामांकित अभिनेते राज बब्बर आणि अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) यांचा मुलगा आहे. मात्र अंमली पदार्थांच्या व्यसनामुळं त्याला आपल्या आई-वडिलांसारखं लोकप्रिय अभिनेता होता आलं नाही. परंतु व्यसनाधीन झालेल्या या अभिनेत्याला आता आपल्या आईसाठी चित्रपटांमध्ये पुनरागमन करायचं आहे. माझ्या आईला माझा गर्व वाटावा यासाठी आता मी पुनरागमन करणार आहे, मी तिचा मुलगा आहे हे माझ्या कामातून दाखवून देईल, असा निश्चय त्यानं केला आहे.

प्रतीकनं टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी तो स्मिता पाटील यांच्या आठवणीनं भावुक झाला. तो म्हणाला, "दारू आणि अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे माझं करिअर जवळपास संपुष्टात आलं होतं. कुठलाही दिग्दर्शक माझ्यासोबत काम करण्यास तयार नव्हता. कुठलाही निर्माता माझ्या चित्रपटांवर पैसे लावण्यास तयार नव्हता. पण माझ्या आईसाठी मी हे व्यसनाचं चक्र तोडण्याचा निर्णय घेतला. घरातील सर्व अंमली पदार्थ मी दूर फेकून दिलं. जवळपास एक वर्ष मी कुठल्याही अंमली पदार्थाला स्पर्श देखील केला नाही. जेव्हा कधी या पदार्थांची तलफ जाणवायची तेव्हा मी माझ्या कामाबद्दल विचार करायचो"

हे वाचा -  मराठी माणूस जगात भारी! लो बजेट फिल्म्सनाही घडवली 'ऑस्कर'वारी

"माझी आईनं आपल्या जबरदस्त अभिनयाच्या माध्यमातून कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. मला देखील माझ्या आईप्रमाणेच एक उत्तम अभिनेता व्हायचं आहे. मी माझ्या कामातून दाखवून देईन की मी स्मिता पाटीलचा मुलगा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुरुवातीपासून मी करिअर सुरू करण्याचा निर्णय घेतला. नाट्यगृहात जाऊन अभिनय कसा करतात? याची उजळणी केली. लहानमोठ्या नाटकांमध्ये काम केलं. अन् आज मी माझा वेळ योग्य ठिकाणी गुंतवल्यामुळेच व्यसनमुक्त झालो आहे. जर तुम्हाला काय करायचं आहे हे पक्क माहित असेल तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीत व्यसनमुक्त होऊ शकता", असं प्रतीक म्हणाला.

हे वाचा - आता आपल्या पंजाबी स्टारने रिलीज केलं रिहानासाठी गाणं, RiRi Song व्हायरल

प्रतीक हा स्मिता पाटील यांचा मुलगा आहे. तो लहान असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रतीकचं बालपण विदेशात हॉस्टेलमध्ये राहण्यात गेलं. शिवाय आयुष्यातील बराच काळ तो आपल्या वडिलांपासून देखील दूर होता. याच दरम्यान त्याला अंमली पदार्थांचं व्यसन लागलं. बॉलिवूडमध्ये देखील त्याला अपेक्षित यश मिळालं नाही. त्याची तुलना कायम त्याच्या आई-वडिलांशी केली जायची. मात्र करिअरमधील हा उतरता आलेख थांबवण्यासाठी प्रतीकने आपल्या व्यसनावर नियंत्रण मिळवलं. अन् आता तो बॉलिवूडमध्ये जोरदार पुनरागमन करण्याची तयारी करत आहे.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Smita patil