JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'तारक मेहता' आलंय आता ‘मराठी’त; या ठिकाणी क्लिक करा अन् खळखळून हसा

'तारक मेहता' आलंय आता ‘मराठी’त; या ठिकाणी क्लिक करा अन् खळखळून हसा

मराठी प्रेक्षकांना तारक मेहता का उल्टा चष्माची खास भेट; संपूर्ण मालिकेचं मराठीत डबिंग

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 15 एप्रिल**:** तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. गेली 13 वर्ष ही मालिका सातत्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मात्र तरी देखील तारक मेहताचा टीआरपी जराही खाली गेलेला दिसत नाही. यावरुनच या मालिकेच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. खरं तर ही मालिका हिंदी भाषेत तयार करण्यात आली आहे. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल खास मराठी प्रेक्षकांच्या आग्रहाखातर आता तारक मेहता मराठीमध्ये देखील पाहता येऊ शकतं. तारक मेहताचं चित्रीकरण मुंबईत केलं जातं. यामध्ये काम करणारे अनेक कलाकार मराठी आहेत. शिवाय पटकथेनुसार ज्या गोकुलधाम सोसायटीमध्ये मालिकेतील सर्व कलाकार राहतात त्यामध्ये सर्व मराठी सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. असं असताना मालिका मराठीत का नाही? अर्थात हा प्रश्न एका अर्थी बरोबरच आहे कारण तारक मेहताचा मोठा प्रेक्षकवर्ग महाराष्ट्रीयन आहे. त्याच पार्श्वभूमीवर मराठी चाहत्यांच्या आग्रहाखातर अखेर निर्मात्यांनी या मालिकेचं डबिंग आता मराठीत देखील करणं सुरु केलं आहे. या मराठी वर्जनला गोकूळधामची दुनियादारी (Gokuldhamchi Duniyadaria) असं नाव देण्यात आलं आहे. अवश्य पाहा - किसिंग सीन करावे लागतात म्हणून ‘या’ अभिनेत्रीनं सोडलं बॉलिवूड

अवश्य पाहा - नागा साधुंवर टीका करणं अभिनेत्याला पडलं भारी; मिळतायेत जीवे मारण्याच्या धमक्या तारक मेहताचं हे मराठी वर्जन काही महिन्यांपूर्वी फक्त मराठी या वाहिनीवर ब्रॉडकास्ट केलं जात होतं. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळं ते थांबवण्यात आलं. परंतु प्रेक्षकांनी बिलकूल काळजी करु नये. तुम्ही ही मालिके युट्यूबर अगदी मोफत पाहू शकता. सध्या तारक मेहताचे काही जूने भाग डब केले जात आहे. खूप प्रमाणावर मराठी डबिंगचं काम सुरु आहे. येत्या काळात रिअल टाईमलाईनवर मराठी तारक मेहता प्रेक्षकांना पाहता येईल असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या