जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / नागा साधुंवर टीका करणं अभिनेत्याला पडलं भारी; मिळतायेत जीवे मारण्याच्या धमक्या

नागा साधुंवर टीका करणं अभिनेत्याला पडलं भारी; मिळतायेत जीवे मारण्याच्या धमक्या

नागा साधुंवर टीका करणं अभिनेत्याला पडलं भारी; मिळतायेत जीवे मारण्याच्या धमक्या

‘तुझ्या भ्रष्ट वाणीमुळं महाकुंभमेळ्यात कोरोनाचा शिरकाव झाला’; अभिनेत्यावर होतायेत विचित्र आरोप

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 15 एप्रिल**:** करोना विषाणूमुळं (Coronavirus) सध्या संपूर्ण देशात हाहाकार उडाला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. दरम्यान सरकारच्या चिंतेत भर टाकणारी आणखी एक माहिती समोर आली. हरिद्वारमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात शाहीस्नानानंतर 102 भाविकांना कोरोनाची लागण झाली आहे. (Coronavirus in Kumbh Mela) खरं तर हीच भीती काही दिवसांपूर्वी अभिनेता करण वाही (Karan Wahi) यानं व्यक्त केली होती. मात्र त्यामुळं आता जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्याच्या अपशकूनी वाणीमुळंच हा प्रकार घडला असा विचित्र आरोप करणवर केला जात आहे. नेमकं काय म्हणाला होता करण**?** “या नागा साधुंसाठी वर्क फ्रॉम होम नाही का? यांनी गंगेचं पाणी आपल्या घरात नेऊन अंघोळ करावी.” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट त्यानं केली होती. अन् यानंतर काही दिवसांतच कुंभमेळ्यातील शाहीस्नानानंतर तेथील साधुंना कोरोनाची लागण झाली. अन् यासाठी आता काही नेटकरी करणला जबाबदार धरत आहेत. “प्रत्येक वेळी तुम्ही हिंदूंनाच दोष का देता? तुझ्या श्रापित वाणीमुळं ही घटना घडली.” अशा आशायाचे विचित्र आरोप करुन करणला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. करणनं स्वत: एका इन्स्टा पोस्टद्वारे ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली. त्याची ही पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अवश्य पाहा - स्वरानं स्वीकारली कचरापेटीत सापडलेल्या मुलीची जबाबदारी; होतोय कौतुकाचा वर्षाव

null

अवश्य पाहा - शिक्षण विभागानं घेतला मोठा निर्णय; मलायकाच्या ‘मुन्नी बदनाम’वर विद्यार्थी करणार अभ्या

null

देशात करोनाची दुसरी लाट आलेली असतानाच हरिद्वारमध्ये कुंभमेळा होत असून, प्रचंड गर्दीत करोना नियमांची अंमलबजावणी करताना प्रशासनाची त्रेधातिरिपट उडत आहे. कुंभमेळ्यातील सोमवारी शाहीस्नान पार पडले. गंगेतील दुसऱ्या पवित्र स्नानाची पर्वणी साधण्यासाठी हरिद्वारमध्ये तब्बल 28 लाख साधू आणि भाविक दाखल झाले होते. उत्तराखंडच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री 11.30  ते सोमवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 18 हजार 169 भाविकांची चाचण्या करण्यात आल्या. यात 102 साधू आणि भाविक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात