पाओली दाम ही बंगाली सिनेसृष्टीतील एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Paoli dam/Instagram)
2/ 10
बंगालीसोबतच तिनं हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘हेट स्टोरी’ या चित्रपटामुळं ती खऱ्या अर्थानं बॉलिवूडमध्ये प्रकाशझोतात आली होती. (Paoli dam/Instagram)
3/ 10
हेट स्टोरी हा एका रिवेंच ड्रामा पठडीतील चित्रपट होता. सोबतच या चित्रपटात तिनं केलेल्या किसिंग सीन्समुळं ती प्रचंड चर्चेत होती. (Paoli dam/Instagram)
4/ 10
मात्र यानंतर ती बॉलिवूडमध्ये झळकली नाही. कारण प्रत्येक चित्रपटात किसिंग सीनसाठी तिला जबरदस्ती केली जायची त्यामुळं तिनं बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला. (Paoli dam/Instagram)
5/ 10
पाओली रात बाकी है नामक एक नवी वेब सीरिज घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (Paoli dam/Instagram)
6/ 10
या सीरिजच्या निमित्तानं दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत पाओलीनं आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी तिनं बॉलिवूडमधील अनुभव सांगितला. (Paoli dam/Instagram)
7/ 10
“बॉलिवूडमध्ये अत्यंत पठडीबाज चित्रपट तयार केले जातात. शिवाय अभिनेत्रींना कायम दुह्यम भूमिका मिळतात. कायम हिरोंच्या पाठिमागं उभं राहणं. अन् अशा भूमिका मला साकारायच्या नव्हत्या.” (Paoli dam/Instagram)
8/ 10
“हेट स्टोरीनंतर मला अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या. परंतु त्यापैकी कुठल्याच चित्रपटाची पटकथा फारशी चांगली नव्हती. मला मिळणाऱ्या भूमिकेतही फारसा दम नव्हता. शिवाय मी किसिंग सीन करावे अशी निर्मात्यांची अपेक्षा होती.” (Paoli dam/Instagram)
9/ 10
“किसिंग सीन करण्यास माझी हरकत नाही पण कथानकात त्याची गरजच नसेल तर का करावे? असा प्रश्न मी त्यांना विचारायचे. अन् याची अपेक्षित उत्तरं मला कधी मिळाली नाहीत त्यामुळं मी बॉलिवूडपासून दूर राण्याचा निर्णय घेतला.” (Paoli dam/Instagram)
10/ 10
सध्या पाओली बॉलिवूडमध्ये कार्यरत नसली तरी ती हिंदी वेब सीरिजमधून मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. येत्या काळात तिची रात बाकी है ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (Paoli dam/Instagram)