JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सोनू सूदकडे चाहत्याने केली विचित्र मागणी; अभिनेत्याचा जबरदस्त रिप्लाय होतोय VIRAL

सोनू सूदकडे चाहत्याने केली विचित्र मागणी; अभिनेत्याचा जबरदस्त रिप्लाय होतोय VIRAL

सोनू सूदने (Sonu Sood) लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात अनेक गरजूंना मदत केली आहे. अलीकडेच एका चाहत्याने त्याच्याकडे विचित्र मागणी केली आहे. या विचित्र मागणीला चांगल्या शब्दात नकार देत त्यांने बहुमोल संदेश दिला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 फेब्रुवारी: गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सोनू सूद (Sonu Sood) आपल्या चित्रपटांपेक्षा उदारतेसाठी जास्त ओळखला जात आहे. सोनू सूदने लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात अनेक गरजूंना मदत केली होती. तेव्हापासून, इतरांना मदत करण्याची त्याची प्रक्रिया सुरूच आहे. अनेक गरजू लोकं आणि त्याचे चाहते सोशल मीडियाद्वारे सोनू सूदशी मदतीसाठी  संपर्क साधतात. त्याने आतापर्यंत बर्‍याच लोकांना मदतही केली आहे. पण काही वेळा चाहते अशी काही विचित्र मागणी करतात, ज्यामुळे संबंधित चाहत्याची कानउघडणी करणं गरजेचं ठरतं. अलीकडेच एका चाहत्याने सोनू सूदकडे नवीन फोनसाठी मदतीची विनंती केली आहे. यापूर्वी सोनूने अनेक लोकांना फोन गिफ्ट दिला आहे, पण ही बाब जरा वेगळी आहे. संबंधित चाहत्यांने एका ट्वीटमध्ये सोनूला टॅग केलं आहे, ज्यात त्याने अभिनेत्याकडून नवीन फोनची मागणी केली आहे. संबंधित ट्वीटमध्ये त्यांने लिहिलं आहे की, त्याने एका चांगल्या फोनसाठी आपल्या मित्रांसमोर आईची शपथ घेतली आहे. त्यामुळे त्याला कोणत्याही परिस्थितीत नवीन मोबाईल फोन घ्यायचा आहे.'

संबंधित बातम्या

त्याने नवीन फोनसाठी आपल्या आईची शपथ घेतली आहे, पण तो चांगला नवीन फोन घेण्यास सक्षम ठरला नाही. त्यामुळे त्याने मदतीसाठी सोनू सूदकडे साद घातली आहे. यावेळी सोनूने देखील प्रेमळ शब्दांत कानउघडणी केली आहे. त्याने संबंधित ट्वीटला क्वोट करत चाहत्यांना एक गोंडस संदेश दिला आहे. सोनूचा हा रिप्लाय सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेक चाहत्यांनी याला पसंती दिली आहे. (हे वाचा- गरजू मुलांना शिक्षणासाठी सोनू सूदकडून Scholarship; कसा भरायचा अर्ज वाचा ) सोनूने संबंधित चाहत्याला फोन न घेण्याचा सल्ला देत, एक चांगला संदेश दिला आहे. सोनूने आपल्या चाहत्याच्या ट्वीटला क्वोट करत लिहिलं की, ‘आईची शपथ घेवून एखाद्याची मदत कर भावा, आई अजून आशीर्वाद देईल. फोन तर प्रत्येकाकडे आहेच, पण आईचा आशीर्वाद फार कमी जणांकडे आहे. सोनूचं हे ट्वीट चांगलचं व्हायरल होतं आहे. तसेच अनेकांनी सोनूच्या सकारात्मक विचाराचं कौतुकही केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या