गरजू मुलांना शिक्षणासाठी सोनू सूदकडून Scholarship; कसा भरायचा अर्ज वाचा

गरजू मुलांना शिक्षणासाठी सोनू सूदकडून Scholarship; कसा भरायचा अर्ज वाचा

गरीब आणि गरजू मुलं ज्यांना पैशांअभावी शिक्षण पूर्ण करता येत नाही, त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सोनू सूदने (sonu sood) स्कॉलरशिप (Scholarship) सुरू केली आहे.

  • Share this:

मुंबई, 12 सप्टेंबर : प्रवासी मजुरांसाठी रोजगार अॅप आणि या अॅपच्या माध्यमातून त्यांना घराची ऑफर दिल्यानंतर आता सोनू सूदने (sonu sood= गरजू मुलांच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप (scholarships) सुरू केली आहे. कोरोनाच्या या परिस्थितीत सोनू सूदने तशी अनेक गरजू मुलांना शिक्षणात मदत केल्याचं आपण आता पाहिलं आहे आणि आता त्याने आणखी एक पाऊल पुढे टाकत स्कॉलरशिप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

गरीब आणि गरजू मुलं, ज्यांना पैशांअभावी शिक्षण पूर्ण करता येत नाही, त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सोनू सूदने पुढाकार घेतला आहे. सोनूने अशा मुलांसाठी  स्कॉलरशिप सुरू केली आहे. त्याने आपल्या सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. सोनूने याबाबत ट्वीट केलं आहे.

"जेव्हा सर्व शिकतील, तेव्हाच हिंदुस्तान पुढे जाईल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फुल स्कॉलरशिप लाँच करत आहे. आर्थिक आव्हानं कोणत्याही लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी रोखू शकत नाहीत असा विश्वास मला आहे. पुढील दहा दिवसांत तुम्ही scholarships@sonusood.me यावर एंट्री करा आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचेन", असं ट्वीट सोनूने केलं आहे.

हे वाचा - Real Hero! मजुरांच्या मुलांना मोफत शिक्षणत देतोय 'हा' पोलीस अधिकारी

सोनू म्हणाला, "आपलं भविष्य आपली क्षमता आणि मेहनत ठरवेल. आपण कुठून आलो आहोत, आपली आर्थिक स्थिती काय आहे याचा काहीही संबंध नाही. हा माझा एक प्रयत्न आहे. शाळा संपल्यानंतर पुढील शिक्षणासाठी पूर्ण स्कॉलरशिप. जेणेकरून तुम्ही पुढे जाल आणि देशाच्या प्रगतीत योगदान द्याल. scholarships@sonusood.me यावर ई-मेल करा"

या पोस्टरमध्ये मॅनेजमेंट, वैद्यकीय, कायदे आणि शेतीविषयक अशा सर्व कोर्सेचा समावेश असल्याचं दिसतं आहे. ज्या कुणाला आपलं शाळेनंतरचं शिक्षण पूर्ण करायचं आहे, त्यांच्यासाठी आता आर्थिक अडचण राहणार नाही. कारण त्यांना सोनू सूदने मदतीचा हात दिला आहे.

हे वाचा - कुशल बद्रिके झाला भावूक, ठाणे पालिकेला केली कळकळीची विनंती, पाहा हा VIDEO

कोरोना लॉकडाऊनमध्ये स्थलांतरीत मजुरांना मदत करून बॉलिवूडमध्ये खलनायक अभिनेता सोनू सूद (sonu sood) रिअल लाइफमध्ये हिरो ठरला. प्रवासी मजुरांशिवाय देशातील अनेक गरजूंना त्याने मदत केली. हेल्पालाइन जारी केली. शिवाय सोशल मीडियावरही त्याला अनेक मेसेज येऊ लागले. सोनूला दररोज हजारोंच्या संख्येनं मदत मागणारे मेसेज येतात आणि त्यातील जास्तीत जास्त लोकांना मदत पुरवण्याचा प्रयत्न सोनू करतो.

हे वाचा - किडनी फेलमुळे अनुराधा पौडवाल यांच्या मुलाचा मृत्यू; काय आहेत याची कारणं, लक्षणं

फक्त आपल्या मदत मागणारेच नव्हे तर त्याला बातम्यांमधून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या कुणाला मदतीची गरज आहे, असं दिसतं, त्यांची माहिती मिळवून तो त्यांना स्वत: मदत करतो. अशा अनेकांचं वर्तमान त्याने सावरलं आहे आणि भविष्य साकारण्यासाठी पाठिंबा दिला आहे.

Published by: Priya Lad
First published: September 12, 2020, 3:31 PM IST

ताज्या बातम्या