मुंबई, 26 मार्च: कोरोना विषाणूचा (Coronavirus) भारतात शिरकाव झाल्यापासून बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) अनेक मजुरांना आणि कामगारांना मदत केली आहे. त्याने लॉकडाऊनच्या काळात अनेक परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावात किंवा शहरात पाठवून देण्यासाठी बहुमोल मदत केली होती. त्यामुळे सोनू सूदला ‘मसीहा’ची उपाधीही देण्यात आली आहे. त्याच्या कामाची दखल अनेक राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय संघटनांनी घेवून त्याला मानाचे पुरस्कारही (Sonu Sood International award) दिले आहेत. आता त्याच्या पुरस्कारामध्ये आणखी एका पुरस्काराची भर पडली आहे. अलीकडेच आंतराष्ट्रीय संस्था फोर्ब्सने (Forbes) ‘लीडरशिप अवॉर्ड- 2021’ (Leadership Award-2021) हा पुरस्कार देऊन सोनू सूदचा सन्मान केला आहे. याची माहिती सोनू सूदनं स्वतः आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. सोनूने या अवॉर्ड्सचा एक फोटो आणि त्याची प्रतिक्रिया ट्वीट केली आहे. हा अवॉर्डमध्ये सोनूचा उल्लेख ‘कोविड-19 हिरो’ (Covid-19 Hero) असा करण्यात आला आहे. सोनूने हा फोटो शेअर करून आभार मानले आहेत. सोनूला हा पुरस्कार व्हर्चुअल पद्धतीनं देण्यात आला आहे.
सोनूच्या या ट्वीटनंतर अनेक चाहत्यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. खरंतर अभिनेता सोनू सूदने कोरोना काळात लोकांना खूप मदत केली आहे. या काळात सोनूने स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोहचण्यासाठी मदत केली होती. त्याचबरोबर अलीकडेचं त्याने बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलं आहे. देशातील तब्बल 1 लाख स्थलांतरितांना रोजगार मिळवून देणार असल्याचं त्याने म्हटलं आहे. सोनूच्या या आश्वासनानंतर तरुणांमध्ये नवीन आशा निर्माण झाली आहे. हे ही वाचा - सोनू सूदच्या कर्तृत्वाचा डंका आता आकाशातही घुमणार, स्पाइस जेटनं केला खास गौरव याव्यतिरिक्त भारतीय विमान कंपनी स्पाइस जेटने, सोनू सूदच्या कामाचा गौरव करण्यासाठी कंपनीच्या स्पायजेट बोईंग 737 या विमानावर (Sonu Sood photo on Spice jet) एक मोठा फोटो लावला आह. या फोटोसोबतच स्पाइस जेटने सोनूसाठी इंग्रजीत एक खास ओळ देखील लिहिली होती. त्यांनी लिहिलं की ‘ए सॅल्यूट टू द सेव्हियर सोनू सूद’ अर्थातचं ‘देवदूत सोनू सूदला सलाम’. हा फोटो शेअर करताना सोनूनेही ट्विटरवर भावनिक संदेश लिहिला आहे. त्यानं लिहिलं की, ‘विना आरक्षित तिकीटावर पंजाबमधील मोगा ते मुंबई दरम्यान केलेल्या प्रवासाची आठवण झाली. आज मी माझ्या आई बाबांना मिस करत आहे.’