मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सोनू सूदच्या कर्तृत्वाचा डंका आता आकाशातही घुमणार, स्पाइस जेटनं केला खास गौरव

सोनू सूदच्या कर्तृत्वाचा डंका आता आकाशातही घुमणार, स्पाइस जेटनं केला खास गौरव

भारतीय विमान कंपनी स्पाइस जेटने, सोनू सूदच्या कामाचा गौरव करण्यासाठी कंपनीच्या स्पायजेट बोईंग 737 या विमानावर (Sonu Sood photo on Spice jet) एक मोठा फोटो लावला आहे.

भारतीय विमान कंपनी स्पाइस जेटने, सोनू सूदच्या कामाचा गौरव करण्यासाठी कंपनीच्या स्पायजेट बोईंग 737 या विमानावर (Sonu Sood photo on Spice jet) एक मोठा फोटो लावला आहे.

भारतीय विमान कंपनी स्पाइस जेटने, सोनू सूदच्या कामाचा गौरव करण्यासाठी कंपनीच्या स्पायजेट बोईंग 737 या विमानावर (Sonu Sood photo on Spice jet) एक मोठा फोटो लावला आहे.

मुंबई, 20 मार्च : गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूड अभिनेता (Bollywood Actor) सोनू सूदने (Sonu sood) कोरोना विरुद्धच्या लढाईत कंबर कसली आहे. त्या गेल्या काही काळात त्याने अनेक गरजू लोकांना मदत (sonu sood helped many needy people) केली आहे. त्याच्या कामाची दखल स्पाइस जेट या विमान कंपनीनं (Spice jet airline) घेतली आहे. त्यामुळे सोनू सूदचं कर्तृत्व आता गगनभरारी घेणार आहे. या निमित्ताने गरजूंच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असणारा बॉलीवूड अभिनेता सोनू सूद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी स्पाइसजेट एअरलाइन्सने सोनूचं कामाचे विशेष आभार मानले आहेत. कंपनीने सोनू सूदच्या कार्याबद्दल अनोख्या पद्धतीने त्याचा गौरव केला आहे.

भारतीय विमान कंपनी स्पाइस जेटने, सोनू सूदच्या कामाचा गौरव करण्यासाठी कंपनीच्या स्पायजेट बोईंग 737 या विमानावर (Sonu Sood photo on Spice jet) एक मोठा फोटो लावला आहे. या फोटोसोबतच स्पाइस जेटने सोनूसाठी इंग्रजीत एक खास ओळ देखील लिहिली आहे. त्यांनी लिहिलं की 'ए सॅल्यूट टू द सेव्हियर सोनू सूद' अर्थातचं 'देवदूत सोनू सूदला वंदन'. हा फोटो शेअर करताना सोनूनेही ट्विटरवर भावनिक संदेश लिहिला आहे. त्यानं लिहिलं की, 'विना आरक्षित तिकीटावर पंजाबमधील मोगा ते मुंबई दरम्यान केलेल्या प्रवासाची आठवण झाली. आज मी माझ्या आई बाबांना मिस करत आहे.'

सोनू सूदच्या या ट्विटनंतर लोकांनी अनेक प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. अनेकांनी सोनूचं अभिनंदन केलं आहे. यापूर्वी सोनू सूदने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्याने लिहिलं की, 'जगात दोन प्रकारचे गरीब लोकं असतात. एक म्हणजे परिस्थितीमुळे गरीब आणि दुसरा म्हणजे गरीब लोकांना मदत न करू शकलेला गरीब. हा दुसरा गरीब हा पहिल्या गरीबापेक्षा खूपच गरीब आहे.' सोनू सूदने या ट्विटच्या माध्यमातून देशाती बड्या उद्योगपतींना टोमना मारला होता. जे केवळ मोठं मोठ्या गप्पा करतात, पण गरीबांना मदत करायची म्हटलं की, हात आकडतात.

हे ही वाचा - रिअल हिरो; सोनू सूदच्या मदतीमुळे तो 12 वर्षांनंतर स्वत:च्या पायावर उभा राहिला

खरंतर अभिनेता सोनू सूदने कोरोना काळात लोकांना खूप मदत केली. या काळात सोनूने स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोहचण्यासाठी मदत केली होती. त्याचबरोबर अलीकडेचं त्याने बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलं आहे. देशातील तब्बल 1 लाख स्थलांतरितांना रोजगार मिळवून देणार असल्याचं त्याने म्हटलं आहे. सोनूच्या या आश्वासनानंतर तरुणांमध्ये नवीन आशा निर्माण झाली आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood News, Sonu Sood