मुंबई, 07 एप्रिल: बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) सध्या त्याच्या ‘मिशन मजनू’ (Mission Majnu) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची कहाणी 1970 च्या दशकात घडलेल्या वास्तविक घटनेवर अधारित आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्कंठा वाढली आली आहे. सिद्धार्थ सध्या लखनऊमध्ये आपल्या चित्रपटाचं चित्रीकरण (Mission Majanu shooting) करत आहे. या चित्रपटात सिद्धार्थनं गुप्तहेराची भूमिका साकारली असून यामध्ये अनेक अॅक्शन सिन्स (Action Scene) आहेत. दरम्यान या चित्रपटातील एक अॅक्शन सीन करताना सिद्धार्थ मल्होत्राला दुखापत (Siddharth Malhotra Injured) झाली आहे. मात्र दुखापतीनंतरही सिद्धार्थ मल्होत्राने आराम केला नाही. त्याने लगेच उर्वरित सीन पूर्ण केला आहे. पिंकविलाच्या वृत्तानुसार, सिद्धार्थ मिशन मजनूसाठी जंप अॅक्शन सीक्वेन्स शूट करत होता. यावेळी त्याचा पाय एका धातुच्या वस्तूला धडकला असून त्याला इजा झाली आहे. यानंतर शूटिंग थांबवण्याऐवजी सिद्धार्थनं मेडिकेशन घेऊन उर्वरित अॅक्शन सीन पूर्ण केला आहे. सिद्धार्थच्या गुडघ्याला ही दुखापत झाली आहे, तरीही त्याने पुढचे 3 दिवस शूटिंग चालू ठेवलं होतं. (हे वाचा- एकेकाळी होता सुपरस्टार; ऐश्वर्या रायचा पडद्यावरील हा ‘हिरो’ सध्या काय करतोय? ) भारत आणि पाकिस्तान संबंधावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाच्या सेटवरचा एक फोटो अलीकडेच त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला होता. यामध्ये चाहत्यांना सिद्धार्थचा हटके लुक पाहायला मिळाला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढत चालली आहे. ‘मिशन मजनू’ या चित्रपटात सिद्धार्थ भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारत असून तो पाकिस्तानमध्ये जाऊन धाडसी मिशन पूर्ण करताना दिसणार आहे. या एका मिशनमुळे दोन्ही देशांमधील संबंध कायमचे बदलले आहेत. (हे वाचा - अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा, रकुल प्रीत प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज; Thank You सिनेमाची घोषणा ) या चित्रपटाचं दिग्दर्शन शांतनु बाग करत आहेत. या चित्रपटात सिद्धार्थसोबतच दक्षिणात्य सुपरस्टार रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. रश्मिकानं चित्रपटाच्या शूटिंगच्या सुरूवातीला एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यावेळी तिने लिहिलं होतं की, ‘मिशन मजनूबद्दल मी पुन्हा एकदा उत्साही आणि अस्वस्थ आहे. मला पदार्पण करत असल्यासारखं वाटत आहे.