एकेकाळी होता सुपरस्टार; ऐश्वर्या रायचा पडद्यावरील हा 'हिरो' सध्या काय करतोय?

एकेकाळी होता सुपरस्टार; ऐश्वर्या रायचा पडद्यावरील हा 'हिरो' सध्या काय करतोय?

प्रशांत थियागराजनने (Prashanth Thiagrajan) बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हिच्यासोबत सुमारे 23 वर्षांपूर्वी जीन्स (Jeans) हा चित्रपट केला होता.

  • Share this:

मुंबई, 06 एप्रिल : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्यांनी आतापर्यंत बॉलिवूडमध्ये (Bollywood) नशीब आजमवण्याचा प्रयत्न केला. त्यात काही जण यशस्वी झाले तर काही जणांना फारसं यश मिळाल नाही. परंतु, काही दक्षिणात्य अभिनेत्यांनी आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्रींसोबत काम केल्यानं ते चर्चेत आले. असंच एक नाव म्हणजे प्रशांत थियागराजन (Prashanth Thiagrajan). बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हिच्यासोबत प्रशांतने सुमारे 23 वर्षांपूर्वी जीन्स (Jeans) हा चित्रपट केला होता. त्यावेळी तो सुपरस्टार म्हणून ओळखला जायचा. नुकताच प्रशांत थियागराजन याने आपला वाढदिवस साजरा केला. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊ अभिनेता प्रशांत थियागराजन याच्या खासगी आयुष्यातील रोचक बाबी.

प्रशांत थियागराजन हा ऐश्वर्या राय हिच्या तिसऱ्या चित्रपटाचा म्हणजेच जीन्सचा हिरो होता. हा चित्रपट सुमारे 23 वर्षांपूर्वी म्हणजेच 1998 मध्ये रिलीज झाला होता. श्रवणीय संगीत आणि गाणी यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिला.

प्रशांत थियागराजन याचा जन्म 6 एप्रिल 1973 ला चेन्नईमध्ये झाला. प्रशांतचे वडील थियागराजन तामिळ सिनेसृष्टीतील प्रख्यात निर्माता-दिग्दर्शक असल्याने साहजिकच प्रशांतचे रुपेरी पडद्यावर आगमन झालं. प्रशांतच्या घरचं वातावरण फिल्मी असल्याने या सर्व गोष्टींचा प्रभाव प्रशांतवर पडला. यामुळे चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याचा निर्णय त्याने घेतला. कौटुंबिक पार्श्वभूमी सिनेसृष्टीशी निगडीत असल्यानं त्याला फारसं स्ट्रगल करावं लागलं नाही. वयाच्या 17 वर्षी 1990 मध्ये त्याने तामिळ रोमॅंटिक ड्रामा वैगसी पोराणतचू या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटातील त्याचा अभिनय प्रशंसनीय ठरला. 1998 मध्ये रिलीज झालेल्या जीन्स या चित्रपटात ऐश्वर्या रायसोबत त्याने अभिनय केला. 90 च्या दशकात तो सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता होता. शंकर दिग्दर्शित जीन्स या चित्रपटामुळे प्रशांतला अभिनेता म्हणून अधिक ठळकपणे ओळख मिळाली. कमल हसननंतर शंकर (Shankar) आणि मणिरत्नम (Maniratnam) या दोन दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम करणारा प्रशांत हा दुसरा अभिनेता ठरला. या चित्रपटातील त्याची आणि ऐश्वर्याची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

हे वाचा - श्रुती हसनने बजावला मतदानाचा हक्क, अभिनेता विजयची सायकलवरून Master एंट्री

प्रशांत एका ज्वेलरी मार्टचा मालक असून, तो उत्तम पियानोवादक देखील आहे. प्रशांत 2005 मध्ये व्ही. डी. गृहलक्ष्मी हिच्यासोबत विवाहबद्ध झाला. परंतु विवाहानंतर 3 वर्षांतच दोघांचा घटस्फोट झाला. या दाम्पत्याला एक मुलगादेखील आहे. आपल्या 30 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये प्रशांतने तामिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये अभिनय केला. थोली मुधु (1993), मंगन (1994),कृष्णा (1996), जीन्स (1998), चॉकलेट (2001), विजेता (2003), शॉक (2004), लंडन (2005) आणि पौन्नार शंकर (2011) हे त्याचे काही चित्रपट होय.

परंतु, 2000 नंतर त्याची क्रेझ काहीशी कमी होऊ लागली. चुकीच्या चित्रपटांची निवड केल्याचं कारण यामागे सांगितलं जातं. 2006 मध्ये प्रशांतने चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला आणि 2011 मध्ये तो पुन्हा चित्रपटसृष्टीत परतला.

हे वाचा - राहुल वैद्य आणि दिशा परमारने गुपचूप लग्न केलं? पाहा VIRAL PHOTO मागील सत्य

काही दिवसांपूर्वी मिळालेल्या माहितीनुसार, तो सध्या आयुष्मान खुरानाच्या अंधाधून (Andhadhun) या चित्रपटाचा रिमेक बनवत आहे. परंतु, तरीही पडद्यावरील त्याचे दर्शन तुलनेने कमी झालं आहे.

First published: April 6, 2021, 11:10 PM IST

ताज्या बातम्या