JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘सरकारला निवडणुकीची चिंता नाही’; शेतकरी आंदोलनावरुन शत्रूघ्न सिन्हा यांचा टोला

‘सरकारला निवडणुकीची चिंता नाही’; शेतकरी आंदोलनावरुन शत्रूघ्न सिन्हा यांचा टोला

येत्या 6 मार्चला शेतकरी आंदोलनाला 100 दिवस पुर्ण होत आहेत. या निमित्तानं अभिनेते शत्रुध्न यांनी पुन्हा एकदा मोदी सरकरावर निशाणा साधला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 7 मार्च: कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमाणामुळं शेतकरी आंदोलनाची (Indian farmers protest) चर्चा हळूहळू मागे पडू लागली होती. परंतु 26 जानेवारी रोजी झालेल्या प्रकारानंतर काहीसं थंडावलेलं आंदोलन पुन्हा एकदा जोर धरु लागण्याची शक्यता आहे. येत्या 6 मार्चला शेतकरी आंदोलनाला 100 दिवस पुर्ण होत आहेत. या निमित्तानं अभिनेते शत्रूघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी पुन्हा एकदा मोदी सरकरावर निशाणा साधला आहे. “100 दिवस हे कुठल्याही आंदोलनासाठी बराच मोठा काळ असतो. इतकं मोठं आंदोलन यापूर्वी कधी पाहिलं नाही. याचे दोन अर्थ निघतात एकतर सरकार या आंदोलनाकडे दुर्लक्ष करतेय किंवा आगामी निवडणूकांची सरकारला चिंता नाही.” अशा आशायचं ट्विट करुन शत्रूघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

अवश्य पाहा - Farmer Protest: बॉलिवूडचा मोर्चा आता शेतकरी आंदोलनाकडे? सिनेक्षेत्रातून नवी घोषणा या ट्विटनंतर लेखक प्रसुन बाजपेयी यांनी देखील शेतकरी आंदोलनावरुन केंद्राला टोला लगावला. “हा नवा समाज आता बदलाच्या दिशेने जातोय. शेतकरी आंदोलननानं सत्तेत असलेल्या सरकारला चांगलाच धडा शिकवला आहे.” अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं. या कलाकारांची ही ट्विट्स सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

दिल्लीच्या सीमा रेषांवर बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शनिवारी 100 दिवस पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने शेतकरी आंदोलक दिल्लीकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या महामार्गावर रास्तारोको करणार असल्याचं वृत्त राऊटर्सने दिलं आहे. डिसेंबर महिन्यापासून हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमारेषांवर तंबू ठोकून आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी विषयक कायद्यांना विरोध करण्यासाठी हे आंदोलन सुरू होत असून शनिवारी या आंदोलनाला 100 दिवस पूर्ण होत आहेत. केंद्र सरकारने हे कायदे रद्द करावेत आणि नंतर चर्चा करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या