मुंबई, 03 मार्च: शेतकरी आंदोलनाला (Farmer Protest) सर्व स्तरावरून पाठिंबा मिळत असताना आता बॉलिवूडमधूनसुद्धा एक बातमी समोर येते आहे. लवकरच शेतकऱ्यांवर लवकरच एक चित्रपट येणार आहे. ‘दिल्ली 6’ आणि ‘ रंग दे बसंती’ सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलेले दिग्दर्शक राकेश ओम प्रकाश मेहरा (Rakeysh Omprakash Mehra ) या फिल्मचं दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाच्या कथालेखनाची जबाबदारी कमलेश पांडे यांनी सांभाळली आहे.
चित्रपटाचे लेखक यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना हा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं की या चित्रपटाची मूळ कथा ही शेतकऱ्यांच्या आयुष्यावर आधारित आहे. शेतकऱ्यांना दररोज कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे. त्यांचं आयुष्य हा एक संघर्षमय प्रवास बनत चालला आहे. सध्या आम्ही या चित्रपटाच्या स्क्रीप्टवर काम करत आहोत आणि खूप दिवसांपासून या चित्रपटावर देखील काम सुरू आहे.
जवळपास गेल्या 4 वर्षांपासून या चित्रपटावर काम सुरू आहे आणि देशात सध्याची शेतकरी आंदोलनाची परिस्थिती पाहता त्याचा संदर्भ या चित्रपटाशी जोडायचा की नाही हा निर्णय पूर्णपणे निर्मात्याचा असेल असंदेखील त्यांनी सांगितलं. पण जर निर्मात्यांनी परवानगी दिली तर शेतकरी आंदोलनावरचं हा चित्रपट तयार होऊ शकतो असं देखील ते म्हणाले.
हे वाचा - जान्हवीचा पहिलाच आयटम साँग पाहून प्रेक्षक झाले अवाक; तुम्हाला कसा वाटतोय पाहा
एका रिपोर्टनुसार मात्र या चित्रपटात शेतकरी आंदोलन दाखवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या देशात चालू असलेलं शेतकरी आंदोलन आणि त्याला मिळत असलेला प्रतिसाद पाहता जर आता हा चित्रपट बनला तर तो सुपरहिट होण्याची शक्यता आहे. अजूनतरी या चित्रपटाचे नाव घोषित करण्यात आलेलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Farmer protest