JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 40 वर्ष चाहत्यांच्या मनावर राज्य करणारे शशी कपूर; पाहा कसे झाले सुपरस्टार

40 वर्ष चाहत्यांच्या मनावर राज्य करणारे शशी कपूर; पाहा कसे झाले सुपरस्टार

शशी कपूर (Shashi kapoor) बॉलिवूडमधील (Bollywood) काही निवडक अभिनेत्यापैकी एक आहेत, ज्यांच्या चित्रपटातील गाणी, संवाद आजही रसिकांना तोंडपाठ आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 18 मार्च: शशी कपूर (Shashi kapoor) बॉलिवूडमधील (Bollywood) काही निवडक अभिनेत्यापैकी एक आहेत, ज्यांच्या चित्रपटातील गाणी, संवाद आजही रसिकांना तोंडपाठ आहेत. वयाच्या दहाव्या वर्षी बाल कलाकार म्हणून आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या शशी कपूर यांची आज 83वी जयंती आहे. अतिशय राजबिंडं, लोभस व्यक्तिमत्त्व असणाऱ्या शशी कपूर यांनी अभिनय आणि देखणेपणा या जोरावर तब्बल 40 वर्षे बॉलिवूडवर राज्य केलं. आजही बॉलिवूडमधील एक देखणा अभिनेता म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. शंभरपेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या शशी कपूर यांनी विविध प्रकारच्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. शशी कपूर यांचा जन्म कोलकाता इथं 18 मार्च 1938 मध्ये झाला. दिग्गज अभिनेते पृथ्वीराज कपूर (Prithviraj Kapoor) यांचे ते सर्वांत लहान पुत्र होते. त्याचं मूळ नाव बलबीरराज कपूर होतं. बॉलिवूडमध्ये आल्यानंतर त्यांनी आपलं नाव शशी कपूर केलं. 1948 मध्ये प्रदर्शित झालेल्या आग (Aag) या दिग्दर्शक राज कपूर (Raj Kapoor) यांच्या चित्रपटातून बालकलाकार म्हणून शशी कपूर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट खूपच गाजला. अवश्य पाहा - शशी कपूर यांच्या एका डायलॉगमुळं या अभिनेत्रीचं संपलं करिअर या राजबिंड्या अभिनेत्याची प्रेमकहाणीही एखाद्या राजकुमाराच्या परिकथेसारखी होती. त्याचं आणि त्यांच्या पत्नीचं परस्परांवरचे प्रेम, एकमेकांना दिलेली साथ, जेनिफर यांच्या अकाली मृत्यूनंतर शशी कपूर यांनी एकट्यानं काढलेलं आयुष्य यामुळं आजही मेड फॉर इच अदर जोडी म्हणून त्याचं नाव घेतलं जातं. अवश्य पाहा - ‘माझ्याही घरावर ईडीनं धाड टाकावी’; मराठी दिग्दर्शक झाला रातोरात श्रीमंत तरुण वयात रंगभूमीवर काम करत असताना शशी कपूर यांची ओळख परदेशी अभिनेत्री जेनिफर केंडल (Jenifer Kendel) हिच्याशी झाली. दोघांचे प्रेम जमले; पण जेनिफरच्या वडिलांचा या दोघांच्या लग्नाला विरोध होता. जेनिफर यांनी आपलं घरही सोडलं. मोठ्या संघर्षानंतर अखेर दोघांचं लग्न झालं. त्यानंतर काही कालावधीनंतर 60 च्या दशकात शशी कपूर यांना चित्रपटात काम मिळत नव्हतं; त्या वेळी एक वेळ अशी आली होती की त्यांची आर्थिक स्थिती खालावल्यानं त्यांना आपली आवडती स्पोर्टस कार विकावी लागली, जेनिफर यांना आपलं काही मौल्यवान सामानही विकावं लागलं होतं, अशी आठवण शशी कपूर यांचे पुत्र कुणाल कपूर यांनी सांगितली. शशी कपूर यांचा अभिनेत्री नंदा यांच्याबरोबरचा ‘फूल खिले’ हा चित्रपट आला आणि तो सुपरहिट ठरला. त्यानंतर मात्र त्यांनी मागं वळून पाहिलं नाही. एकापेक्षा एक बहारदार चित्रपट त्यांनी दिले. त्यांची कारकीर्द बहरत गेली. तब्बल 40 वर्षे ते रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहिले. या उमद्या अभिनेत्यानं वयाच्या 79 व्या वर्षी 2017 मध्ये अखेरचा श्वास घेतला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या