Home /News /entertainment /

‘माझ्याही घरावर ईडीनं धाड टाकावी’; मराठी दिग्दर्शक झाला रातोरात श्रीमंत

‘माझ्याही घरावर ईडीनं धाड टाकावी’; मराठी दिग्दर्शक झाला रातोरात श्रीमंत

इतक्या मोठ्या पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या या मराठी दिग्दर्शकाची नोंद अनुराग कश्यपने घेतली. त्यानं स्वत:च्या त्याच्या घरी जाऊन त्याच्या कामाची स्तुती केली.

    मुंबई 18 मार्च: अक्षय इंडिकर (Akshay Indikar) हा भारतातील सर्वोत्कृष्ट उभरत्या दिग्दर्शकांपैकी एक आहे. अलिकडेच त्यानं तयार केलेल्या ‘स्थलपुराण’ (Sthalpuran) या चित्रपटाची नोंद जागतिक सिनेमानं घेतली होती. यासाठी ‘यंग सिनेमा अवॉर्ड’ हा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन त्याला गौरवण्यात देखील आलं होतं. ऑस्ट्रेलियातील ‘आशिया पॅसेफिक स्क्रीन अकॅडमी’, ‘ग्रिफिथ स्कूल’ आणि ‘युनेस्को’ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. इतक्या मोठ्या पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या या मराठी दिग्दर्शकाची नोंद अनुराग कश्यपने घेतली. त्यानं स्वत:च्या त्याच्या घरी जाऊन त्याच्या कामाची स्तुती केली. अक्षयनं हा अनुभव एका ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला आहे. अनुरागला भेटण्याचा अनुभव कसा होता? जेंव्हा पासून मी सिनेमा करायला सूरवात केली तेंव्हापासूनच माझी एक इच्छा कायम होती की भारतात ज्या माणसांचं सिनेमावर भयंकर प्रेम आहे त्या माणसाला आपलं काम कधीतरी दाखवता आलं पाहिजे.  खुप दुर असूनही कायम जवळचा वाटत रहाणारा माणूस माझ्यासाठी अनुराग होता. एकेरी सहज बोलू शकतो एवढा प्रचंड तरुण स्वभाव मनापासून त्यांनी जपला आहे. अवश्य पाहा - शशी कपूर यांच्या एका डायलॉगमुळं या अभिनेत्रीचं संपलं करिअर मला ख्यातनाम समीक्षक नम्रता जोशी यांचा मेसेज आला अनुराग कश्यप यांना तुझं काम बघायची इच्छा आहे ,तुझा नंबर मी दिला आहे. मी ओके म्हणलो. दुसऱ्या दिवशी मला केरळ च्या विमानतळावर एक ईमेल आला. घाई घाईत बघितला. हॅलो अक्षय , मी अनुराग  ,मी तुझ्या शहरात शूटिंग करतोय , तुझा सिनेमा बघता येईल का ? आणि भेटता येणं शक्य आहे का? मी स्वतःला चिमटा काढला , तोंडावर पाणी मारलं. रिप्लाय लिहला. चार वाजता वेळ ठिकाण ठरलं. चार वाजयला तीन मिनिट कमी असताना भल्या मोठ्या बॉडीगार्ड सोबत अनुराग  आला. कडकडून मिठी मारली. मग काय मोठया पडद्यावर , एका मोठया थेटर मध्ये ज्याच्या कडे बघून सिनेमा करण्याचं धाडस एकवटत इरेने लढत राहिलो तो शेजारी , आम्ही दोघे माझा सिनेमा बघतोय. अवश्य पाहा - ‘जॅक स्नायडर्स जस्टिस लीग’ कुठे आणि किती रुपयांना पाहाता येईल? मी आनंदाने मनातून नाचत होतो. फिल्म संपल्यावर काहीच बोलले नाहीत. फक्त एकच वाक्य. कितना pure व्हिजन है. बस. मैं एक मिनिट के लिये भी फिल्म से नहीं हटा. बास माझ्यासाठी एक वाक्य खूप पुरेसं होतं. म्हणलं  थोडा वेळ माझ्या घरी या . माझ्या घरी अडीच तास मी तेजश्री आणि अनुराग  तिघे.  तेजश्री त्याना म्हणाली आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचायला खूप प्रयत्न करत होतो त्यावर लगेच ते म्हणाले काहीही लागलं तर मी आहे. कारण तुम्ही तुमची लढाई लढला आहात. कायम लक्षात राहील असं वाक्य. पहिल्याच भेटीत खूप जुनी मैत्री असल्यासारखी त्यांनी, मला माझ्या आयुष्यात मोठा भाऊ आहे असं क्षणभर वाटून गेलं. आमच्या दोघांची शाळा घेतली , सिनेमातले अनेक गुंतागुंतीचे मुद्दे , कायदेशीर प्रक्रिया इत्यादी इत्यादी  काम कसं करायचं दोन तास आम्हाला पूर्ण एक एक मुद्दा समजावून सांगत होता. सिनेमावर अफाट प्रेम असणारा माणूस. माझ्या विषयी त्यांनी इत्यंभूत माहिती काढून ठेवली होती हे मला नंतर त्यांच्या बॉडीगार्ड ने सांगितलं. बोलता बोलता म्हणाले सोलापूर ला मटण खायला जायचं आहे कधीतरी जाऊ. गप्पांचे विषय काहीही अगदी दीपिका पदुकोण ते फतेह अकिन बरोबर च सिनेमा ते त्यांनी केलेलं ब्राझील मधलं शूटिंग ते त्यांचं सिनेमा एवढंच प्रेम समुद्रउडी ते माझा जगभरच्या फेस्टीव्हल मधला अनुभव ते त्यांचा २८ वर्षाचा सिनेमाचा प्रवास. मी त्यांचे खूप इंटरव्ह्यू यू ट्यूब वर बघितले आहेत, माझ्या घरातल्या खुर्चीवर बसून हा माणूस बोलतोय हे क्षणभर विसरून मी यू ट्यूब वरचं काहीतरी बघतोय असं वाटत होतं. आमची साऊ त्यांची दाढी ओढून चश्मा ओढून काहीतरी म्हणू पाहत होती. दोन अडीच तासांनी भरपेट खाऊन पुढे वेळ दिली असल्याने निघाले. निघताना एकच वाक्य वापरलं रास्ता मुश्किल होता है लेकीन जैसे हो वैसे रहो. फ्रीडम की किमत कोई नहीं खरिद सकता. कडकडुन मिठी मारून आमच्या घरातून निरोप घेतला  भारतातला सगळयात महत्वाचा दिग्दर्शक निर्माता ऑस्कर चा मेंबर हे बच्चन साहेबांच्या पासून ते शाहरुख खान पर्यंत सगळ्यांशी मैत्री असणारा माणूस चार तास मनापासून बोलत होता. उगाच आपल्याकडे जसे दिग्दर्शक भाव खात मातीशी नाळ तोडून आव आणून जगतात तसलं काही नव्हतं. आता माझ्या पण घरावर इडी ने रेड टाकायला हरकत नाही एवढी संपत्ती देऊ केली त्या इस्टेटच मोजमाप कसं करु शकणार?
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Anurag kashyap, Entertainment, Marathi entertainment, Movie release

    पुढील बातम्या