जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / Birthday Special: शशी कपूर यांच्या एका डायलॉगमुळं या अभिनेत्रीचं संपलं करिअर

Birthday Special: शशी कपूर यांच्या एका डायलॉगमुळं या अभिनेत्रीचं संपलं करिअर

Birthday Special: शशी कपूर यांच्या एका डायलॉगमुळं या अभिनेत्रीचं संपलं करिअर

त्यांच्या याच लोकप्रियतेचा फटका अभिनेत्री निरुपा रॉय (Nirupa Roy) यांना बसला होता. आज शशी कपूर यांची 82वी जयंती आहे. यानिमित्तानं जाणून घेऊया तो गंमतीशीर किस्सा…

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 18 मार्च: शशी कपूर (Shashi Kapoor) हे बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. 70-80च्या दशकात त्यांनी आपल्या जबदस्त अभिनयाच्या जोरावर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. अमिताभ बच्चन यशाच्या शिखरावर असतानाही शशी कपूर यांनी त्यांना जबदस्त टक्कर दिली होती. यावरुनच त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. मात्र त्यांच्या याच लोकप्रियतेचा फटका अभिनेत्री निरुपा रॉय (Nirupa Roy) यांना बसला होता. आज शशी कपूर यांची 82वी जयंती आहे. यानिमित्तानं जाणून घेऊया तो गंमतीशीर किस्सा… दिवार (Deewaar) या चित्रपटात निरुपा रॉय यांनी शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारली होती. 1975 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही मेरे पास मां है (Mere Paas Maa Hai) या डायलॉगमुळं ओळखला जातो. मात्र याच डॉयलॉगमुळं निरुपा रॉय यांच्या करिअरला उतरती कळा लागली. हा डायलॉग इतका गाजला की त्यामुळं निरुपा रॉय यांना केवळ आईच्याच भूमिकेसाठी विचारलं जाऊ लागलं. दिवार प्रदर्शित झाला त्यावेळी त्या केवळ 45 वर्षांच्या होत्या. मात्र आपल्या जबरद्स्त अभिनयामुळं त्यांनी आईची भूमिका अजरामर केली. निरुपा रॉय या एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांनी सोज्वळ सू ते क्रांतीकारी महिला अशा विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांना नेहमीच एक प्रयोगशाली अभिनेत्री म्हणून ओळखलं जायचं. परंतु दिवार नंतर त्यांना एकाही चित्रपटात आई व्यतिरिक्त कुठलीही भूमिका साकारण्याची संधी मिळाली नाही. यामुळं त्या शशी कपूर यांच्यावर काही काळ नाराज देखील होत्या. अवश्य पाहा - ‘जॅक स्नायडर्स जस्टिस लीग’ कुठे आणि किती रुपयांना पाहाता येईल?

शशी कपूर यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. 1948 साली आग या चित्रपटात त्यांनी बालकलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर 1961 साली त्यांनी धर्मपुत्र या चित्रपटातून खऱ्या अर्थानं आपल्या करिअरची सुरुवात केली. पुढे सत्यम शिवम सुंदरम, सुहाग, नमक हलाल, सिलसिला, आ गले लग जा, काला पत्थर, चोर मचाए शोर यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. 2017 साली त्यांचं निधन झालं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात