JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / कतरिना कैफ नाही तर तिच्या बहिणीवर फिदा झालाय सलमान खान, शेअर केला अभिनेत्रीचा हा VIDEO

कतरिना कैफ नाही तर तिच्या बहिणीवर फिदा झालाय सलमान खान, शेअर केला अभिनेत्रीचा हा VIDEO

कतरीना कैफची (Katrina Kaif) धाकटी बहीण इसाबेल कैफचं कौतुक करत सलमान खानने (Salman Khan) एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे सलमान कतरिनाच्या बहिणीवर फिदा झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 03 डिसेंबर: अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ यांच्या अफेअरची चर्चा बॉलिवूडमध्ये विशेष रंगली होती. 2005 मध्ये मैंने प्यार क्यों किया (Mine Pyar Kyon Kiya) या सिनेमातून कतरिनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.  कतरिना कैफ आज 15 वर्षांनंतरही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्र्यांपैकी एक आहे.  आता कतरिना पाठोपाठ तिची धाकटी बहीण इसाबेल कैफ (Isabelle Kaif) देखील मोठी फॅन फॉलोइंग मिळवत आहे. इसाबेलने माशा-अल्लाह (Masha-allah) या गाण्याच्या माध्यमातून मनोरंजन विश्वात एंट्री केली आहे. इसाबेलचं हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून या सोशल मीडियावर(Social media) जोरदार प्रतिसाद मिळत आहे. बॉलिवूडमध्ये कतरिनाला लाँच करणाऱ्या सलमान खानने देखील इसाबेलचं हे गाणं सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. एवढंच नव्हे तर तिच्या गाण्याचं कौतुक करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सलमानने  केलेलं इसाबेलचं कौतुक बघता कतरीना प्रमाणेच सलमान इसाबेलला देखील लाँच करेल अशी शक्यता नाकारता येणार नाही.

संबंधित बातम्या

इसाबेलचं माशा-अल्लाह हे गाणं Deep Money ने गायलं असून तो पंजाबीमधील (Punjabi) एक नामंकित गायक आहे. विशेष बाब म्हणजे यापूर्वी त्याने सलमान खानच्याच रेस 3 (Race 3) या सिनेमातील हिरीये (Hiriye) या गाण्यामुळे तो बॉलिवूडमध्ये प्रसिद्धीस आला होता. त्याचप्रमाणे कतरिनाची बहीण इसाबेल कतरीना इतकीच सुंदर आहे, त्यांच्यामध्ये बरेच साम्यही आहे. सोशल मीडियावरही तिचे फॉलोअर्स वाढत आहे. तिचं हे गाणं देखील सोशल मीडियवर प्रसिद्ध होत आहे. (हे वाचा- लग्नाआधीच प्रेग्नेंट होती अभिनेत्री; आता पतीशी घटस्फोट,एकटीच करतेय मुलाचा सांभाळ ) नवीन अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये लाँच करण्याबद्दल बोलायचं झालं तर नव्वदच्या दशकात भाग्यश्री (Bhagyashri), नगमा (Nagma), रवीना टंडन (Ravina Tondon),आयेशा जुल्का (Ayesh Julka), रेवती (Revati) यांसारख्या नामांकित अभिनेत्रींना देखील सलमाननेच लाँच केलं होतं. त्यानंतर सलमाननेच लाँच केलेल्या कतरीना कैफ, सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha), डेझी शाह(Daisy Shah), झरीन खान (Zarin Khan) या अभिनेत्री आजही बॉलिवूडवर अधिराज्य करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या