B'day Spl: लग्नाआधीच प्रेग्नेंट होती अभिनेत्री; आता पतीशी घटस्फोट, एकटीच करतेय मुलाचा सांभाळ

B'day Spl: लग्नाआधीच प्रेग्नेंट होती अभिनेत्री; आता पतीशी घटस्फोट, एकटीच करतेय मुलाचा सांभाळ

दोघांनी 2010 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर काही दिवसांनीच तिने मुलगा हारून याला जन्म दिला. पण त्यांचं वैवाहिक आयुष्य फार काळ टिकू शकलं नाही आणि काही वर्षात दोघांचे मार्ग वेगळे झाले.

  • Share this:

मुंबई, 3 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा (Konkona Sen Sharma) आज आपला 41वा वाढदिवस (Happy Birthday Konkona Sen Sharma) साजरा करत आहे. कोंकणाची केवळ बॉलिवूड कारकीर्दच नाही, तर पर्सनल लाईफ देखील मोठी चर्चेत राहिली आहे. बॉलिवूडमध्ये कोणताही गॉडफादर नसताना देखील प्रतिभेच्या बळावर आपलं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या काही अभिनेत्रींमध्ये तिचा समावेश होतो.

नॅशनल अवॉर्ड विजेत्या कोंकणा सेन शर्माने लहान वयातच सिनेमांत काम करायला सुरुवात केली होती. कोंकणाचे वडील प्रसिद्ध पत्रकार मुकुल शर्मा आणि आई डायरेक्टर आणि अभिनेत्री अपर्णा सेन (Aparna sen) आहेत. बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. 1983 मध्ये आलेल्या इंदिरा या बंगाली सिनेमातून तिने बालकलाकार म्हणून सुरुवात केली होती.

(वाचा - दीपिकाची मॅनेजर करिष्माच्या घरावर छापा मारणारे NCB चे अधिकारी निलंबित)

त्यानंतर बंगाली सिनेमात तिने पहिल्यांदा अभिनेत्री म्हणून पाऊल ठेवले. ‘एक जे आछे कन्या' या सिनेमातील तिच्या भूमिकेचं मोठं कौतुकही झालं. तिचा हा अभिनेत्री म्हणून पहिलाच सिनेमा होता. त्यानंतर 2002 मध्ये ऋतुपर्णो घोष याच्या 'तितली' मध्ये ती दिसली होती. या सिनेमातील तिची भूमिकाही लोकांच्या पसंतीस उतरली.

बॉलिवूड सिनेमांमध्ये काम करण्यास सुरुवात केल्यानंतर ‘आजा नच ले' या सिनेमावेळी तिची रणवीर शौरी (Ranvir shouri) याच्याबरोबर भेट झाली. त्यानंतर दोघे एकमेकांना भेटू लागले. त्यांच्या अफेअरची बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा देखील होत असे. पण या अफेअरच्या दरम्यानच कोंकणा प्रेग्नेंट राहिली. त्यामुळे दोघांनी 2010 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर काही दिवसांनीच तिने मुलगा हारून याला जन्म दिला. पण त्यांचं वैवाहिक आयुष्य फार काळ टिकू शकलं नाही आणि काही वर्षात दोघांचे मार्ग वेगळे झाले.

(वाचा - वयातील अंतरावरुन टीका करणाऱ्यांना गौहर खानचं सणसणीत उत्तर; म्हणाली झैद आणि मी...)

2015 मध्ये दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावरही आम्ही दोघे वेगळे होत असल्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यानंतर 5 वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेण्याचा देखील निर्णय घेतला. यावर्षी ऑगस्टमध्ये दोघांचा घटस्फोट झाला असून मुलाचा ताबा कोंकणा सेनला देण्यात आला आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: December 3, 2020, 2:06 PM IST

ताज्या बातम्या