मुंबई 10 मार्च : काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) हिच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलला आहे. 21 फेब्रुवारीला करिना आणि सैफ यांना पूत्ररत्नाचा लाभ झाला आहे. अशात आता सैफ (Saif Ali Khan) आपल्या पत्नीला खास गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर मंगळवारी पहिल्यांदा सैफ आणि करिना मुंबईत सोबत दिसले. हे दोघंही एका कारच्या टेस्ट ड्राइव्हसाठी (car test drive) घरातून बाहेर पडले होते. ही कार सैफ करिनाला गिफ्ट देणार असल्याचं समोर येत आहे.
या दोघांनीही मंगळवारी (Mercedes-Benz G-Class) ची टेस्ट ड्राइव्ह घेतली. यादरम्यान सैफ गाडी चालवताना दिसला तर करिना बाजूच्या सीटवर बसली होती. यावेळचा दोघांचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर सैफ करिनासाठी ही गाडी विकत घेणार आहे. Mercedes-Benz G-Class या कारची किंमत तब्बल 2.5 कोटी इतकी आहे.
काही दिवसांपूर्वीच या जोडप्यानं मुंबईमध्ये नवीन घर विकत घेतलं आणि तिथे शिफ्ट केलं. यानंतर आता सैफ Mercedes-Benz G-Class ही कार करिनाला गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. करिनाच्या बाळाचा चेहरा पाहाण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अभिनेत्रीनं काही दिवसांपूर्वीच मुलासोबतच एक फोटोही पोस्ट केला होता. मात्र, यातही मुलाचा चेहरा दिसत नव्हता. 21 फेब्रुवारीला सैफनं स्वतः दुसऱ्या मुलाच्या जन्माची बातमी दिली होती. अद्याप या कपलनं आपल्या बाळाच्या नावाबद्दलही माहिती दिलेली नाही.