JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ऋषभ पंतने उर्वशी रौतेलाला whatssapp वर का केलं होतं ब्लॉक; अखेर खुलासा झालाच!

ऋषभ पंतने उर्वशी रौतेलाला whatssapp वर का केलं होतं ब्लॉक; अखेर खुलासा झालाच!

अभिनेत्री उर्वशी रौतेलाला (Urvashi Rautela) आणि क्रिकेटपटू ऋषभ पंतने (Rishabh pant) whatssapp वर ब्लॉक केल्यानंतर अनेक चर्चा रंगल्या होत्या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 एप्रिल  : अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि क्रिकेटपटू (Cricketer) ऋषभ पंत (Rishabh pant)  यांच्यातील कॉन्ट्रोव्हर्सी याआधी समोर आली होती. तर ऋषभने उर्वशीला व्हॉट्सअॅपवर ब्लॉकही (Urvashi Rautela block by Rishabh pant on whatssapp) केलं होतं. त्यामुळे दोघंही चर्चेत आले होते. पण यामागचं कारण स्पष्ट झालं नव्हतं. आता यामागील काही गोष्टींचा खुलासा झाला आहे. नुकतंच उर्वशीने तिच्या सोशल मीडियावर एक चॅट सेशन केलं होतं. त्यामध्ये तिच्या चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले होते. बऱ्याचशा प्रश्नांची तिने उत्तरंदेखील दिली होती. तेव्हा एका चाहत्याने तिला तिच्या आवडत्या क्रिकेटरविषयी विचारलं. तेव्हा आपण क्रिकेट पाहत नसल्याचं उर्वशी म्हणाली. तर आपण कोणत्याही क्रिकेटपटूला ओळखत नसल्याचंही तिने सांगितलं. पण  सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्याबद्दल आपल्या मनात नितांत आदर असल्याचं ती म्हणाली. तिच्या या उत्तराने अनेक क्रिकेट चाहते अवाक झाले होते.

संबंधित बातम्या

2018 मध्ये क्रिकेटर ऋषभ पंत आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतरच ऋषभने उर्वशीला ब्लॉक केलं होतं. तर अफवांपासून वाचण्यासाठी ऋषभने ब्लॉक केलं असल्याचं वृत्तही समोर आलं होत. पण उर्वशी आणि ऋषभ दोघांनीही कधीच याबद्दल काहीच भाष्य केलं नाही. पण त्याच वेळी ऋषभने ईशा नेगी सोबत सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते आणि रिलेशनशिप विषयी चाहत्यांना सांगितलं होतं. त्यामुळे उर्वशी आणि ऋषभच्या नात्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. हे वाचा -  सुपरहिट अन्नियनचा येतोय रिमेक; हा बॉलिवूड अभिनेता साकारणार मुख्य भूमिका उर्वशी ही तिच्या लूकमुळे सतत चर्चेत असते. तसेच निरनिराळे फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. नुकताच उर्वशीने एरा पुरस्कार सोहळ्यात केलेल्या महागड्या लुकमुळे तर एका विचित्र मास्कमुळे ती चर्चेत आली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या