2005 साली आलेला साउथचा अन्नियन हा चित्रपट विशेष लोकप्रिय ठरला होता. तर हिंदी मध्ये ‘अपरिचित’ (Aparichit) हा हिंदी डब चित्रपट देखिल दाखवण्यात आला होता. त्याला ही प्रेक्षकांनी चांगली दाद दिली होती. मल्टीपल पर्सनालिटी डिसॉर्डर असलेल्या व्यक्तीची ही कहानी असून एक सायकोलॉजिकल थ्रिलर (psychological thriller) हा चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटात रणवीर ला पाहण्यासाठी चाहते फारच उत्सुक आहेत.View this post on Instagram
हुमा कुरेशीनं हॉलिवूडमध्ये केलं पदार्पण; Army of the Dead चा दमदार ट्रेलर प्रदर्शित
या चित्रपटाशी रणवीरचं नाव जोडलं गेल्यामुळे चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्कंठा आणखी वाढली आहे. रणवीर चित्रपटात असणं म्हणजे चित्रपट हीट ठरणार हे जणू एक समीकरणच बनलं आहे. रामलीला, बाजीराव मस्तानी, पद्मावत, गली बॉय अशा चित्रपटांतून रणवीर ने आपली अभिनयाची जादू दाखवून दिली आहे. तेव्हा आता या नव्या नव्या चित्रपटात रणवीरला पाहणं ओत्सुक्याचं ठरेल.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment