JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / रात्रीस खेळ चाले: शेवंता कधी येणार? दिवस केला जाहीर; पाहा काय आहे संदेश

रात्रीस खेळ चाले: शेवंता कधी येणार? दिवस केला जाहीर; पाहा काय आहे संदेश

Ratris Khel Chale: रात्रीस खेळ चाले पर्व 3 सुरू झालं पण अजूनही शेवंता मालिकेत दिसत नाही. पण आता प्रतीक्षा संपेल, अशी पोस्ट झी मराठी वाहिनीने केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 एप्रिल – झी मराठी (zee marathi) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चाले पर्व 3 (Ratris khel chale 3)  सुरू झाली आहे पण प्रेक्षक वाट पाहत आहेत ती शेवंता (shevanta) आणि अण्णा ची. सुरूवातीला शेवंता आणि अण्णा यांची झलक पहायला मिळाली पण त्यानंतर ते दिसले नाहीत. त्याच संदर्भात झी मराठी वाहिनीने एक पोस्ट केली आहे. व शेवंताच्या परत येण्याचे संकेत दिले आहेत. तर तारीख जाणून घेण्यासाठी तुम्हालाच कष्ट घेऊन मोबाईलचा ब्राईटनेस वाढवायला सांगितला आहे.

1 एप्रिलला मराठी अभिनेत्रीने दिली Good News! एप्रिल फूल नव्हे हे सांगायला शेअर केला बेबी बंपसह फोटो

त्यामुळे शेवंताची एंट्री कधी होणार यासाठी हा फोटो ब्राईटनेस (brightness) करून पहा. तर शेवंताच्या परतण्याची तारीख एप्रिल फूल अशी आहे. म्हणजेच आपण सगळेच एप्रिल फूल बनलो आहोत. झी मराठी ने प्रेक्षकांसोबत हा गमतीशीर प्रॅन्क केला होता. त्यात कोणतीही तारीख लिहिली नव्हती.

संबंधित बातम्या

मालिकेत एका एका पात्राची एन्ट्री होत आहे. माई, माधव नंतर अभिराम आणि कावेरी आली. नंतर दत्ता आणि सरिता आले तर सुषमा आणि पांडू देखिल दिसत आहेत. पण मालिकेचा श्वास असलेले अण्णा आणि शेवंता अजूनही दिलसे नाहीत. प्रेक्षक त्यांची आतूरतेने वाट पाहत आहेत. सध्या सरिता पुन्हा एकदा नाईकांच्या वाड्यात प्रवेश करूण स्वताचा हिस्सा मागत आहे. पण इंदू मात्र तिला काहीही द्यायला तयार नाही. तर दुसरीकडे कावेरीची मात्र तब्येत बिघडली आहे.शेवंता तिच्या आत प्रवेश करते त्यामुळे कावेरीचा स्वातावर ताबा नाही. त्यामुळे कावेरी आता नाईकांच्या वाड्यात प्रवेश केलेल्या सरिता ला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा कावेरी खरचं सरिता ला संपवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण शेवंता नक्की कधी येणार हे अजूनही गुलद्स्त्यातच आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या