मुंबई, 23 मार्च : (Actress Urmila Nimbalkar shares baby bump photo) अभिनेत्री उर्मिला निंबाळकर (Urmila Nimbalkar) ने तिच्या चाहत्यांसोबत एक गोड बातमी शेअर केली आहे. बेबी बंप (baby bump) सहीत तिने फोटो पोस्ट करूण आपण आई होणार असल्याचे म्हटले आहे. पती सुकीर्त गुमास्ते सोबत तिने फोटो शेअर केला आहे.
कुणी तरी येणार येणार गं… म्हणत तिने ही गोड बातमी शेअर केली. त्यामुळे तिच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. पण आज एक एप्रिल असल्याने उर्मिला आपली फिरकी तर घेत नाही ना अशी शंका येऊ नये यासाठी तिने हे एप्रिल फूल (April Fool’s day) नाही असंही नमूद केल. तिच्या या मॅटरनिटी शूट (maternity shoot) ला चाहत्यांच्या लाईक्स मिळत आहेत. तर तिच्या पतीने म्हणजेच सुकीर्त गुमास्तेने ही एक सुंदर कॅप्शन लिहीत बातमी शेअर केली. वी आर प्रेग्नंट (We are pregnant) अशी कॅप्शन (caption) त्याने फोटोला दिली आहे.
वाचा - बॉलिवूडचा अजब खेळ; चित्रपट सुपरहिट होताच अभिनेत्री होतात रिप्लेस
उर्मिला ही एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक प्रसिद्ध युटुबर (youtuber) सुद्धा आहे. तसेच तिची भरपूर फॅनफोलोईंग ही आहे. ती सोशल मिडीयावर कायम सक्रिय असते.
उर्मिलाने काही मराठी तसेच हिंदी मालिकांमधेही (Hindi serials) काम केल आहे. दिया और बाती हम (Dia aur bati hum) , मेरी आशिकी तुमसेही (meri ashiqui tumse hi) या हिंदी मालिकांतही तिने काम केल आहे. या शिवाय मराठीतील दुहेरी (Duheri) मालिकेत तिने काम केलं होतं. ही मालिका विशेष गाजली होती.