मुंबई 18 एप्रिल**:** अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असते. देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती रोखठोकपणे प्रतिक्रिया देते. यावेळी तिनं देशभरात सुरु असलेल्या IPL सामन्यांवर निशाणा साधला आहे. सर्वत्र लॉकडाउन आहे. सामान्य माणसाला घराबाहेर पडण्यासाठी निर्बंध लादले जात आहेत. मग अशा परिस्थितीत IPL सामने खेळण्यासाठी परवानगी कशी काय दिली? असा रोखठोक सवाल तिनं सरकारला केला आहे. राखीनं टीव्ही 9ला दिलेल्या मुलाखतीत IPL बाबत आपला राग व्यक्त केला. “कोरोनाचे नियम सर्वसामान्य लोकांसाठी वेगळे आणि क्रिकेटपटूंसाठी वेगळे असं का? जर निर्बंध लादायचेच असतील तर सर्वांवर सारखेच लादा. हे सरकार आम्हाला घराबाहेर पडू देत नाही. पण क्रिकेटपटूंना IPL च्या निमित्तानं सर्व काही माफ आहे. मुंबईत लोक कोरोनामुळं मरतायेत अन् हे मस्तपैकी IPL चे सामने खेळतायेत.” अशी नाराजी राखीनं व्यक्त केली. यापूर्वी देखील काही सेलिब्रिटींनी IPL सामन्यांवर प्रश्न उपस्थित केले होते. अवश्य पाहा - 19 एप्रिलला होतेय दयाबेनची वापसी; ‘तारक मेहता’च्या निर्मात्यांनी केली मोठी घोषणा कोरोनानं घेतले 1 लाख 75 हजार 649 बळी देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 1 कोटी 45 लाख 26 हजार 609 इतका झाला आहे. यापैकी आजपर्यंत 1 कोटी 26 लाख 71 हजार 220 रुग्ण कोरोनावर मात करून बरे देखील झाले आहेत. मात्र, अजूनही देशात 16 लाख 79 हजार 740 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आणि त्यामध्ये रोज नव्या रुग्णांची भर पडत आहेत. त्यासोबतच देशात आजपर्यंत कोरोनामुळे तब्बल 1 लाख 75 हजार 649 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारला गांभीर्याने पावलं उचलण्याची अपेक्षा सर्वच स्तरातून व्यक्त केली जात आहे.