मुंबई 18 एप्रिल: तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. गेली 13 वर्ष ही मालिका सातत्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मात्र तरी देखील तारक मेहताचा टीआरपी जराही खाली गेलेला दिसत नाही. यावरुनच या मालिकेच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. अन् आता ही लोकप्रिय मालिका अनिमेटेड फॉर्ममध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सीरिजला तारक मेहता का छोटा चष्मा (Taarak Mehta Kka Chhota Chashmah) असं नाव देण्यात आलं आहे. विशेषत: लहान मुलांच्या आग्रहास्तव या सीरिजची निर्मिती केली गेली आहे.
तारक मेहताच्या निर्मात्यांनी ट्विटरद्वारे ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पत्रकार पोपटलाल या सीरिजबद्दल माहिती देताना दिसत आहे. या सीरिजच्या माध्यमातून फँटसी वर्ल्डमध्ये जाणासाठी सज्ज व्हा. येत्या 19 एप्रिलपासून सोनी ये या किड्स वाहिनीवर सकाळी साडे अकरा वाजता ही सीरिज ब्रॉडकास्ट केली जाणार आहे. अशी माहिती पोपटलालनं या व्हिडीओमध्ये दिली. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
Agar humari tarah aap bhi dil se bacche ho, toh #TMKOC ke Animated roop se milo. Ab dekhiye #TaarakMehtaKaOoltahChashmah as #TaarakMehtaKkaChhotaChashmah, 19th April se Monday to Friday at 11:30 am only on @SonyYAY!@AsitKumarrModi @TMKCC pic.twitter.com/A0WhYWAqRJ
— Taarak Mehta Ka Ooltah Chashmah (@TMKOC_NTF) April 17, 2021
अवश्य पाहा - 'तारक मेहता' आलंय आता ‘मराठी’त; या ठिकाणी क्लिक करा अन् खळखळून हसा
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेली 13 वर्ष सातत्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अलिकडेच या मालिकेचं मराठी वर्जन देखील सुरु करण्यात आलं. अन् आता लहान मुलांसाठी अनिमेडेट सीरिज सुरु करण्यात आली आहे. गेल्या काळात मालिकेत दयाबेन पुन्हा कधी येणार? हा प्रश्न वारंवार प्रेक्षक निर्मात्यांना विचारत आहेत. या सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा दयाबेन पाहता येईल. अन् दयाचा हा अनिमेडेट अवतार प्रेक्षकांना आवडेल अशी अपेक्षा निर्मात्यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Comedy, Dayaben, Dayaben returns, Taarak mehta ka ooltah chashma, TV serials