मुंबई 26 फेब्रुवारी : भुवया उंचावत आणि नजरेचे बाण चालवत अनेकांच्या मनावर राज्य करणारी दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर (Priya Prakash Warrier) लवकरच एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘क्रॅक’ असं या आगामी चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आता ती तेलुगु सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. दरम्यान या चित्रपटातील एका गाण्याचं चित्रीकरण सुरु असतानाच एक अपघात झाला. अन् तिच्या डोक्यावर मार बसला. या अपघाताचा व्हिडीओ सध्या जोरजार व्हायरल होत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे हा व्हिडीओ स्वत: प्रियानंच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कुठल्याशा गाण्याचं चित्रीकरण सुरु आहे. हिरो पुढे चालतोय. तेवढ्यात प्रिया मागुन येते अन् त्याच्या पाठीवर उडी मारते. दरम्यान उडी मारत असताना तिचा तोल गेला अन् ती खाली जमिनीवर आदळली. यादरम्यान तिच्या डोक्यावर मार बसला. अर्थात तिला खाली पडलेलं पाहु सर्व मंडळी धावत आले मात्र प्रियानं आपण ठिक आहोत हा शॉट पुन्हा एकदा चित्रीत करुया असा इशारा निर्मात्यांना दिला.
अवश्य पाहा - VIDEO: मैत्रिणीनंच जेव्हा केला होता घात; नोराला आठवला करिअरमधील तो किस्सा हे आयुष्य मला सतत खाली पाडण्याचा प्रयत्न करते. सतत माझ्या वाटचालीत अडचणी आणते. ही पाहा त्याची एक झलक. खाली पडल्यावर मी प्रत्येकवेळी उभी राहाते आणि आत्मविश्वासानं संकटांचा सामना करते. अशा आशयाची कॉमेंट लिहून तिनं हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत प्रियाच्या जिद्दीचं कौतुक केलं आहे.