जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: मैत्रिणीनंच जेव्हा केला होता घात; नोराला आठवला करिअरमधील तो किस्सा

VIDEO: मैत्रिणीनंच जेव्हा केला होता घात; नोराला आठवला करिअरमधील तो किस्सा

VIDEO: मैत्रिणीनंच जेव्हा केला होता घात; नोराला आठवला करिअरमधील तो किस्सा

वरकरणी ग्लॅमरस वाटणारा हा प्रवास नोरासाठी इतका सोपा नव्हता. प्रचंड संघर्ष केल्यानंतर तिनं हे यश संपादित केलं आहे. एक काळ असाही होत जेव्हा लोक तिची खिल्ली उडवायचे. एकदा तर तिचा पासपोर्ट देखील चोरी करण्यात आला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 25 फेब्रुवारी: नोरा फतेही (Nora Fatehi) ही सध्याची आघाडिची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या ग्लॅमरस डान्सनं चाहत्यांना घायाळ करणाऱ्या नोरानं फारच कमी कालावधीत प्रचंड लोकप्रियता मिळवली. परंतु वरकरणी ग्लॅमरस वाटणारा हा प्रवास नोरासाठी इतका सोपा नव्हता. प्रचंड संघर्ष केल्यानंतर तिनं हे यश संपादित केलं आहे. एक काळ असाही होत जेव्हा लोक तिची खिल्ली उडवायचे. एकदा तर तिचा पासपोर्ट देखील चोरी करण्यात आला होता. (Nora Fatehi Crying) नोरानं अलिकडेच अनस बुशाख नामक एका युट्यूबरला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिनं आपल्या करिअरमधील काही थक्क करणारे अनुभव सांगितले. “मला चांगलं नाचता येत होतं. त्यामुळे भारतात आल्यावर मला भरपूर काम मिळेल. रातोरात मी सुपरस्टार होईन ही स्वप्न उराशी बाळगून मी इथे आले होते. परंतु असं काहीच घडलं नाही. अनेक ठिकाणी ऑडिशन्स दिली. लोक माझी खिल्ली उडवायचे. माझ्या पेक्षा अधिक सुंदर मुलींना स्ट्रगल करताना पाहून माझा आत्मविश्वास हळूहळू कमी होत होता. 10 मुलींसोबत मी एका लहानशा खोलीत राहात होते. या मुलींनी माझा पासपोर्ट देखील चोरला होता. याच दरम्यान मला दिलबर या गाण्यावर नाचण्याची संधी मिळाली. अन् या गाण्यानं माझं आयुष्य बदललं. जी मंडळी माझ्यावर हसायचे ते माझी स्तुती करु लागले.” हा अनुभव सांगताना नोराला रडू कोसळलं. या मुलाखतीचा व्हिडीओ तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

जाहिरात

अवश्य पाहा - आजीबाईंचा ‘टॉप टकर’ डान्स पाहिला का?; VIDEO पाहून बादशाह देखील झाला थक्क नोरा फतेही ही मुळची कॅनडाची नागरीक आहे. बॉलिवूडमनध्ये काम करण्यासाठी ती भारतात आली होती. तिनं 2014 साली टायगर ऑफ द सुंदरबन या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. त्यानंत क्रेजी चेक, टेंपर, डबल बॅरिअर, किक, लोफर यांसारख्या अनेक हिंदी, तामिळ आणि तेलुगु चित्रपटांमध्ये तिनं लहानमोठ्या भूमिका साकारल्या. तिला खरी लोकप्रियता मिळाली ती बिग बॉस या रिअलिटी शोमुळं. त्यानंतर सत्यमेव जयते या चित्रपटातील दिलबर या गाण्यामुळं तिला बॉलिवूडमधील आघाडिच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळालं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात