मुंबई 25 मार्च**:** प्रकाश राज (Prakash Raj) हे भारतीय सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. आज त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. प्रकाश राज हे अभिनयासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळं देखील चर्चेत असतात. देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ते रोखठोकपणे प्रतिक्रिया देतात. त्यामुळं अनेकदा त्यांना ट्रोल देखील केलं जातं. असाच काहीसा प्रकार काही वर्षांपूर्वी त्यांच्या लग्नाच्या बाबतीत घडला होता. 12 वर्ष लहान तरुणीसोबत लग्न केल्यामुळं त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. (Prakash Raj controversial marriage life) प्रकाश राज यांनी 1994 साली ललिता यांच्यासोबत लग्न केलं होतं. मात्र त्यांचा संसार दिर्घकाळ टीकला नाही. अंतर्गत मतभेदांमुळं काही वर्षातच त्यांनी घटस्फोट घेतला. परंतु घटस्फोटानंतर काही वर्षातच त्यांचं नाव प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर पोनी वर्मा यांच्यासोबत जोडलं जाऊ लागलं. त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं अन् त्यांनी लग्न केलं. खरं तर या लग्नाला प्रकाश राज यांच्या मुलांचा विरोध होता. शिवाय पोनी आणि प्रकाश यांच्यात जवळपास 12 वर्षांचं अंतर होतं त्यामुळं अनेक प्रेक्षकांनी देखील त्यांच्यावर टीका केली होती. परंतु समाजाची पर्वा न करता त्यांनी लग्न केलं. प्रकाश राज यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ही दोन्ही मुलं त्यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेली आहेत. अवश्य पाहा - सफाई कर्मचारी ते सुपरस्टार अभिनेते; पाहा प्रकाश राज यांचा थक्क करणारा प्रवास प्रकाश राज यांनी ‘कांचिवरम’, ‘लरुवार’, ‘बोंमारिलू’, ‘सिंघम’, ‘पारिगु’, ‘वॉन्टेड’, ‘संतोष सुब्रमण्यम’, ‘अंतापुरम’ यांसारख्या अनेक तमिळ, हिंदी, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत विनोदी, खलनायक, तरुण, वृद्ध अशा सर्व प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. प्रकाश राज यांना भारतातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखलं जातं.