जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सफाई कर्मचारी ते सुपरस्टार अभिनेते; पाहा प्रकाश राज यांचा थक्क करणारा प्रवास

सफाई कर्मचारी ते सुपरस्टार अभिनेते; पाहा प्रकाश राज यांचा थक्क करणारा प्रवास

सफाई कर्मचारी ते सुपरस्टार अभिनेते; पाहा प्रकाश राज यांचा थक्क करणारा प्रवास

जहा चाह वहा राह असाच काहीसा प्रकार प्रकाश राज यांच्या बाबतीत घडला. त्यांनी अफाट मेहनत करुन सफाई कर्मचारी ते लोकप्रिय अभिनेता हा पल्ला गाठला. (Prakash Raj how to become a superstar)

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 25 मार्च**:** प्रकाश राज (Prakash Raj) हे भारतीय सिनेसृष्टीतील एक दमदार अभिनेते म्हणून ओळखले जातात. केवळ दाक्षिणात्य सिनेसृष्टीतच नव्हे तर पार बॉलिवूडमध्ये देखील त्यांनी आपल्या अनोख्या अभिनयाची छाप सोडली आहे. अशा या लोकप्रिय अभिनेत्यानं रंगभूमीवर सफाई कर्मचाऱ्याचं काम करुन आपल्या करिअरची सुरुवात केली होती. परंतु असं म्हणतात जहा चाह वहा राह असाच काहीसा प्रकार प्रकाश राज यांच्या बाबतीत घडला. त्यांनी अफाट मेहनत करुन सफाई कर्मचारी ते लोकप्रिय अभिनेता हा पल्ला गाठला. (Prakash Raj how to become a superstar) 26 मार्च 1965 साली बंगळुरुमधील एका गरीब कुटुंबात प्रकाश राज यांचा जन्म झाला होता. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची प्रचंड आवड होती. या आवडीनं त्यांना रंगभूमीच्या दिशेनं खेचलं. थिएटरमध्ये सफाई करणं, कलाकारांच्या चहा पाण्याची व्यवस्था करणं, स्टेजवर लागणाऱ्या वस्तु नेऊन देणं अशा प्रकारची कामं प्रकाश राज करायचे. यासाठी त्यांना महिना 300 रुपये पगार मिळत होता. परंतु अशी काम करत असतानाच हळूहळू त्यांना एखाद्या कलाकाराच्या अनुपस्थित त्याची भूमिका साकारण्याची संधी मिळे. अशा पद्धतीनं त्यांनी अभिनयक्षेत्रात प्रवेश केला. जवळपास 250 पेक्षा अधिक नाटकांमध्ये त्यांनी काम केलं. त्याचदरम्यान त्यांची जिद्द पाहून बिसिलू कुदुरे या मालिकेत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. अन् तेथून खऱ्या अर्थानं त्यांच्या करिअरला सुरुवात झाली. अवश्य पाहा - अरबाज खानने घटस्फोटीत पत्नी मलायकाला दिलं Special Gift; अभिनेत्रीनं केला व्हिडिओ शेअर ही मालिका गाजली. पुढे त्यांना गुद्दा बुधा, रणधीरा, हराकेया खुरी यांसारख्या मालिकेंमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मालिकेंमधून मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळं त्यांना चित्रपटा काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी ‘कांचिवरम’, ‘लरुवार’, ‘बोंमारिलू’, ‘सिंघम’, ‘पारिगु’, ‘वॉन्टेड’, ‘संतोष सुब्रमण्यम’, ‘अंतापुरम’ यांसारख्या अनेक तमिळ, हिंदी, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत विनोदी, खलनायक, तरुण, वृद्ध अशा सर्व प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. प्रकाश राज यांना भारतातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात