मुंबई 27 फेब्रुवारी : बिग बॉस (Bigg Boss 14) हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय रिअलिटी शोंपैकी एक म्हणून ओळखला जातो. देशभरातील अनेक नामांकित कलाकार या शोमध्ये झळकताना दिसतात. अनेक नव्या कलाकांना या शोनं लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवलं आहे. परंतु बिग बॉस जिंकणं हे काही सोपं काम नाही. स्पर्धकांना कुठल्याही संपर्काशिवाय, सोई सुविधांशिवाय 100 दिवस एका घरात बंद राहावं लागतं. मात्र या टास्कमुळं काही कलाकारांच्या शरीरावर विपरित परिणाम देखील होतात. असाच काहीसा परिणाम अभिनेत्री निक्की तांबोळीच्या (Nikki Tamboli) शरीरावर झाला आहे. बिग बॉसमुळं तब्बल 20 किलो वजन तिचं वाढलं आहे. बिग बॉसच्या 14 व्या पर्वात निक्की तांबोळीनं आपल्या मादक अदांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. घरातील सर्वात फिट अँड फाईन स्पर्धक म्हणून ती चर्चेत होती. परंतु जसजसा शो पुढे गेला तसतसं निक्कीचं वजन वाढत गेलं. स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत तिनं आपल्या वाढलेल्या वजनाचं कारण सांगितलं. अवश्य पाहा - तरुणीच्या जिद्दीला सलाम; पाय गमावलेली सोनम ठरली सर्वोत्कृष्ट डान्सर ती म्हणाली, “बिग बॉसच्या घरात मी रोज 12 ते 15 पराठे खात होते. मी अत्यंत डाएट कॉन्सियश आहे. परंतु बिग बॉसमध्ये मात्र माझ्या डाएटचे तीन तेरा वाजले. जवळपास तीन वर्षानंतर मी पोळ्या खाल्ल्या. शिवाय कोल्डड्रिंग्स, कॉफी, चहा किती वेळा घेत होते याचा काही पत्ताच नव्हता. किनोवा, फिश, सूप, सॅलेड असं कुठलाही पोषक आहार मला तिथं मिळाला नाही. परिणामी माझं वजन पहिल्यापेक्षा अधिक वाढलं. जवळपास 20 किलो वजन वाढलं असावं असं मला वाटतं.” निक्की बिग बॉसमधील सर्वात लकप्रिय स्पर्धकांपैकी एक होती. जवळपास सहा आठवडे तिनं इतर कलाकारांशी स्पर्धा केली. मात्र अखेर इतर स्पर्धकांनी मिळून कमी मतदान करत तिला घरातून बाहेर केलं.