तरुणीच्या जिद्दीला सलाम; पाय गमावलेली सोनम ठरली सर्वोत्कृष्ट डान्सर

तरुणीच्या जिद्दीला सलाम; पाय गमावलेली सोनम ठरली सर्वोत्कृष्ट डान्सर

सोनम पाटील ही देखील अशाच प्रेरणादायी व्यक्तीमत्वांपैकी एक आहे. ब्रेन पोलीओमुळं तिनं आपले दोन्ही पाय गमावले. मात्र तरीही तिनं हार मानली नाही. जिद्दीनं नृत्याची आवड जोपासत तिनं पहिला ‘मिस व्हीलचेअर’ पुरस्कार पटकावला.

  • Share this:

जुन्नर 27 फेब्रुवारी : मनात जिद्द आणि तीव्र इच्छाशक्ती असेल तर या जगात काहीही अशक्य नाही. अपंगत्वावर मात करत अफाट यश मिळवणाऱ्या लोकांच्या कथा आजवर तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. सोनम पाटील (Sonam Patil) ही देखील अशाच प्रेरणादायी व्यक्तीमत्वांपैकी एक आहे. ब्रेन पोलीओमुळं तिनं आपले दोन्ही पाय गमावले. मात्र तरीही तिनं हार मानली नाही. जिद्दीनं नृत्याची आवड जोपासत तिनं पहिला ‘मिस व्हीलचेअर’ पुरस्कार (First Miss Wheelchair Award) पटकावला.

नव सृजना संस्थेमार्फत दिल्लीमध्ये दिव्यांगांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यंदाही "अहसास, फिर मुस्कुरायेगा इंडिया"  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जुन्नर तालुक्यातील मतिमंद/दिव्यांग बांधवांसाठी कार्य करणारी माय ऍक्टिव्हिटी सेंटर संचलित नंदनवन संस्थेची कु. सोनम पाटील या विद्यार्थिनीनं सहभाग घेऊन यावर्षीचा 'मिस व्हिलचेअर' हा किताब मिळविला. यावेळी तिनं महाराष्ट्राचे लावणी लोक नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. याच कार्यक्रमात नंदनवनचे संस्थापक- सचिव विकास घोगरे यांना देखील प्रेरक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

फेक न्यूज पसरवणं थांबवा, अन्यथा...; अरिजितच्या गाण्यातून पोलिसांनी दिला खास संदेश

मुंबई, घाटकोपर मधील भीमनगर सारख्या झोपडपट्टीमध्ये वाढलेली सोनम पाटील ही लहान असतानाच ब्रेन पोलिओची शिकार झाल्याने तिचे दोन्ही पाय निर्जीव झाले. महानगरपालिकेच्या शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण कसेबसे झाले. आईच्या मृत्यूनंतर सोनम विविध सामाजिक संस्थांमध्ये राहू लागली. मुळताच नृत्याची आवड असल्यामुळे सोनम हातवारे करून टीव्ही समोर नृत्य करत असे. अशातच तिची ओळख विकास घोगरे यांच्याशी झाली होती. कोरोना काळात सोनम राहत असलेल्या संस्थेने तिला संस्थेतून घरी जायला सांगितले. यावेळी तिला नंदनवन संस्थेचे आसरा दिला. संस्थेत ती नृत्याचे धडे घेत होती आणि अशातच दिल्लीमध्ये एक फॅशन शो होत असल्याची माहिती संस्थेला मिळाली आणि लगेचच सोनमचे नाव नोंदविण्यात आले, विविध पातळी उत्तीर्ण देऊन होत  सोनम अंतिम फेरीत पोहचली. 21 फेब्रुवारी 2021 ला दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमात देशभरातून विविध मॉडेल्सनी सहभाग घेतला होता त्यात सोनमने प्रथम क्रमांक पटकावून 2021 ची "मिस व्हीलचेअर" ठरली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दूरदर्शनचे असिस्टंट डायरेक्टर राजपुरोहित, ब्युटी क्वीन तरन्नुम शेख, गौरव शर्मा, मीनाक्षी ठाकूर मीनाक्षी चौधरी आदी कलाविश्वातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी वन्या कांचन सिंग, रंजीत कुमार, नितीन गुप्ता यांनी विशेष परिश्रम घेतले

Published by: Mandar Gurav
First published: February 27, 2021, 11:46 AM IST

ताज्या बातम्या