मुंबई, 11 एप्रिल: बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. सध्या ती इंडियन आयडलच्या 12 व्या (Indian idol-12) मोसमामुळे ती चर्चेत आहे. इंडियन आयडल-12 या टीव्ही कार्यक्रमात नेहा कक्कर जजच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. यशाच्या शिखरावर पोहचलेल्या नेहाचा एक जुना व्हिडीओ (old video Viral) सध्या सोशल मीडियात व्हायरल होतं आहे. हा व्हिडीओमध्ये नेहा कक्कर एक गाणं गाताना दिसत आहे. हे गाणं ऐकून त्यावेळी जज असणारे प्रसिद्ध गायक अनु मलिक (Anu Malik) यांनी स्वतः ला मारून घेतलं होतं. खरंतर, बॉलिवूड गायिका नेहा कक्करला आज सर्वत्र ओळखलं जातं. सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत. असं असलं तर इथपर्यंत पोहचायला तिला फार संघर्ष करावा लागला आहे. कारकीर्दीच्या सुरुवातीला तिने अनेक कार्यक्रमांत स्पर्धक म्हणून गाणी गायली आहेत. त्यावेळी नेहाने म्युझिक रिअॅलिटी शो इंडियन आयडलच्या दुसऱ्या सीझनमध्ये भाग घेतला होता. यावेळी तिला अनेकांनी नावाजलं होतं, तिच्या आवाजाचे लाखो चाहते झाले होते. पण तिचा या स्पर्धेतला प्रवास फार लांब जाऊ शकला नाही.
पण नेहा कक्कर आज याच स्पर्धेची जज बनली आहे. त्यामुळे तिचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये नेहा कक्कर ‘ऐसा लगाता है’ हे रोमँटिक गाणं गाताना दिसत आहे. तर शोमध्ये सोनू निगम, फराह खान आणि अनु मलिक जजच्या भूमिकेत दिसत आहेत. यावेळी नेहाचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर अनु मलिक तिच्यावर रागावताना दिसत आहे. हे वाचा- ब्रेकअपनंतर नेहा कक्करच्या एक्स बॉयफ्रेंड अनोखा अंदाज, VIDEO VIRAL या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, अनु मलिकने नेहा कक्करला मध्येच थांबवलं आहे. तसेच तिला तिच्या गाण्याबद्दल फटकार लगावली आहे. यावेळी त्याने म्हटलं की, ‘नेहा कक्कर … तुझा आवाज ऐकून मला स्वतः च्या चेहर्यावर चापट मारून घ्यावीशी वाटत आहे. यार काय झालंय तुला? अनु मलिकने केवळ असं म्हणालाच नाही, तर त्याने स्वत: ला चापटही मारून घेतली आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होतं आहे.