ब्रेकअपनंतर नेहा कक्करच्या एक्स बॉयफ्रेंड अनोखा अंदाज, VIDEO VIRAL
ब्रेकअपनंतर नेहा कक्करच्या एक्स बॉयफ्रेंड अनोखा अंदाज, VIDEO VIRAL
नेहानं आता इन्स्चावरूनही दोघांचे रोमँटिक फोटो काढून टाकलेत. तिनं हे ब्रेकअप मान्य केलंय आणि ती पुढचं आयुष्य आनंदानं जगायला सुरुवात केलीय.
ब्रेकअपनंतर नेहा आणि हिमांश हे दोघेही आपल्या कामामध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळतात. नेहा कक्कड रिआलिटी शो च्या शूटींगमध्ये काही दिवसांपूर्वी बिझी होती. तर तिचा एक्सबॉयफ्रेंड ‘बूंदी रायता’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी होता.
मुंबई, 02 मार्च: नेहा कक्कर आणि हिमांश कोहलीच्या रिलेशनशिपसोबतच त्यांच्या ब्रेकअपची ही चर्चा तुफान सुरू होती. या दोघांचे रिलेशनमध्ये असतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र त्यांच्या ब्रेकअपनंतर या दोघांसोबतच त्यांच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर वॉर पाहायला मिळालं.
ब्रेकअपनंतर हिमांश नव्या भूमिकेत चाहत्यांना दिसणार आहे. इन्स्टाग्रामवर हिमांशने एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये हिमांश गायीची सेवा करताना पाहायला मिळत आहे. नेहा आणि हिमांश दोघंही आपल्या कामांमध्ये व्यस्त आहेत. एका बाजूला नेहा कक्कर ‘इंडियन आयडल 11’ च्या शूटींगमध्ये व्यस्त होती. हा शो काही दिवसांपूर्वीचं संपला. तर दुसरीकडे हिमांश आपल्या ‘बूंदी रायता’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त होता.
इन्स्टाग्रामवर हिमांशने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये तो गाईला खायला देत असल्याचं दिसून येतो आहे. ‘I'm A cowboy’ असं कॅप्शन देत हिमांशने हा व्हिडिओ शेअर केला. हिमांशनं शेअर केलेल्या व्हिडिओला चाहत्यांनी पसंती दिली आहे. Cowboy चा व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांनी शेअर केला आहे. हिमांशचा हा व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.