JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अभिनेता संग्राम समेळ दुसऱ्यांदा अडकला लग्नाच्या बेडीत, ही आहे संग्रामची बायको....

अभिनेता संग्राम समेळ दुसऱ्यांदा अडकला लग्नाच्या बेडीत, ही आहे संग्रामची बायको....

Marathi actor Sangram Samel Wedding: चित्रपटसृष्टीत सध्या लग्नसराईचं चालू आहे असंच म्हणावं लागेल. लॉकडाऊनमध्ये आणि लॉकडाऊननंतर सुद्धा अनेक हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक तारे- तारका लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

 मुंबई, 9मार्च: चित्रपटसृष्टीत सध्या लग्नसराईचं चालू आहे असचं म्हणावं लागेल. लॉकडाऊनमध्ये आणि लॉकडाऊननंतर सुद्धा अनेक हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक तारे- तारका लग्नाच्या बेडीत (Marathi actor wedding) अडकले आहेत. त्यातच आता अजून एका नावाची भर पडली आहे. ते म्हणजे मराठी अभिनेता संग्राम समेळ (Marathi actor sangram samel marriage) याची. संग्राम नुकताच लग्नाच्याबेडीत अडकला आहे. त्याच्या लग्नाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. संग्राम समेळनं श्रद्धा फाटक (Sangram samel wife) हिच्याशी लग्नं केलं आहे. श्रद्धा (Shraddha Phatak) ही एक डान्सर आहे. संग्राम आणि श्रद्धाचा हा विवाह सोहळा आज इचलकरंजी याठिकाणी पार पडला. संग्रामचं हे दुसरं लग्न आहे, याआधी संग्रामने 2016 मध्ये ‘रुंजी’ फेम अभिनेत्री पल्लवी पाटीलशी विवाह केला होता. रुंजी या मालिकेतून पल्लवी खूपच प्रसिद्ध झाली होती. पल्लवी आणि संग्राम हे खूप वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यानंतर त्यांच्यात प्रेम निर्माण झाली आणि मग या दोघांनी लग्नं केलं होतं. मात्र हे नात फार काळ टिकलं नाही. संग्राम हा मुळचा ठाण्याचा आहे त्यानं कॉमर्समधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. संग्रामला अभिनयाचा वारसा घरातूनचं मिळालाय असं म्हणावं लागेल. उत्तम लेखक, अभिनेता अशोक समेळ यांचा तो मुलगा आहे. संग्रामने नाटक, चित्रपट,मराठी मालिका यांमधून आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. (हे वाचा:   देविका राणी यांनी दिला होता 1-2 नव्हे तर तब्बल 4 मिनिटांचा किसिंग सीन… ) ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतील ‘समीर’ या व्यक्तीरेखेतून तो महारष्ट्रात घराघरात पोहचला. संग्रामने ललित 205, हे मन बावरे, या मालिकांमधून तर विकी वेलिंगकर, स्वीटी सातारकर, ब्रेव हार्ट (जिद्द जगण्याची) या चित्रपटांत काम केलं आहे. त्याचबरोबर ‘एकच प्याला’ या नाटकामध्येही काम केलं आहे.संग्रामच्या व्हायरल झालेल्या लग्नाच्या फोटोंनंतर सर्वच माध्यमातून या नव्या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या