Home /News /entertainment /

Devika Rani first lady of Indian cinema: ऑनस्क्रीन 'किसिंग'सीन देणारी ही होती पहिली अभिनेत्री...

Devika Rani first lady of Indian cinema: ऑनस्क्रीन 'किसिंग'सीन देणारी ही होती पहिली अभिनेत्री...

चित्रपटसृष्टीत सुरुवातीच्या काळात मुलींना अभिनय क्षेत्रात येण्यासाठीच खूप संघर्ष करावा लागायचा, त्या काळात देविका राणींनी दिला होता 1-2 नव्हे तर तब्बल 4 मिनिटांचा किसिंग सीन.... त्या बिनधास्त अभिनेत्रीची चित्तरकथा त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त

पुढे वाचा ...
  मुंबई, 9मार्च: सध्याच्या काळात अभिनेत्री म्हणून पडद्यावर झळकनं तितकसं कठीण राहिलेलं नाही. मात्र चित्रपटसृष्टीत सुरुवातीच्या काळात मुलींना अभिनय क्षेत्रात येण्याचा विचार देखील करता येणं शक्य नव्हतं. 'चूल आणि मूल' या पारंपरिक कचाट्यात अडकलेल्या स्त्रीला उंबरठ्याच्या बाहेर पाय ठेवण्यासही मज्जाव होता. अशा काळात पुरुषांमध्ये जाऊन अभिनय क्षेत्रात काम करणं हे खूप साहसाचं काम होतं. आणि हेच साहस दाखवलं होतं (Devika Rani) ज्येष्ठ अभिनेत्री 'देविका राणी चौधरी' यांनी. 9 मार्च हा देविका राणी (Devika Rani death anniversary) यांचा स्मृतिदिन. देविका राणी चंदेरी पडद्यावर झळकल्या त्या काळात प्रतिष्ठित घरातील मुलींनी चित्रपटात अभिनय करणं म्हणजे अप्रतिष्ठित कामं समजलं जाई. मात्र या चालीरीतींना झुगारून देविका राणी यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. फक्त अभिनयचं नव्हे तर किसिंग सीनसारखे बोल्ड (First lip lock in Indian cinema Karma film) निर्णय घेत संपूर्ण चित्रपटसृष्टीत खळबळ माजवली होती. वयाच्या 85व्या वर्षी म्हणजेच 9 मार्च 1994 मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्यावहिल्या अभिनेत्री अशी देविका राणींची ओळख आहे. देविका राणी ह्या मूळच्या वालटेअर (विशाखापट्टणम) इथल्या. त्या रवींद्रनाथ टागोर यांच्या कुटुंबाशी देखील संबंधित होत्या. रवींद्रनाथ टागोर यांची बहीण ह्या देविका राणीच्या आजी होत्या. देविका राणींचे वडील कर्नल एस.एम.चौधरी हे मद्रास प्रांतातले पहिले सर्जन जनरल होते. वयाच्या नवव्या वर्षी शिक्षणासाठी त्या इंग्लडला गेल्या. स्थापत्यशास्त्राचं  शिक्षण घेतल्या नंतर मात्र त्यांनी आपला मोर्चा चित्रपटांकडे वळवला.
  लंडनमध्ये असताना त्यांची ओळख हिमांशू रॉय यांच्याशी झाली. त्यानंतर पुढं त्यांनी लग्नसुद्धा केलं. लंडनमधून हिमांशू यांनी चित्रपट तंत्रज्ञानाचं शिक्षण घेतलं होतं. याच शिक्षणाच्या आधारे त्यांनी भारतात येऊन 'बॉम्बे टॉकीज' या चित्रपट संस्थेची निर्मिती केली होती. या संस्थेत तयार होणाऱ्या चित्रपटात देविका राणी यांनी काम केलं आहे. 1933 मध्ये आलेला चित्रपट 'कर्मा' हा भारतीय चित्रपटसृष्टीला एक नवीन वळण देणारा चित्रपट ठरला. कारण याचित्रपटाद्वारे पहिल्यांदा किसिंग सीनचं चित्रण करण्यात आलं होतं. या चित्रपटात देविका राणी आणि हिमांशू रॉय यांनी हा किसिंग सीन दिला होता. 1-2 नव्हे तर तब्बल 4 मिनिटांचा हा किसिंग सीन होता. या चित्रपटानंतर भारतीय चित्रपटसृष्टीत खळबळ माजली होती.तसेच हा इंग्रजी भाषेतील पहिला भारतीय चित्रपट होता.
  भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली अभिनेत्री आणि तीही बोल्ड अभिनेत्री देविका राणी यांनी 10 वर्ष चित्रपटसृष्टीत काम केलं आहे. 1969 मध्ये त्यांना 'दादासाहेब फाळके' पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार पटकावणाऱ्या त्या पहिल्या भारतीय व्यक्ती आहेत. त्याचबरोबर 1958मध्ये त्यांना 'पद्मश्री' पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आलं होतं.
  अशोक कुमार सोबत त्यांची जोडी प्रेक्षकांना खूप पसंत पडली. या जोडीने 'जीवन नैया', 'जन्मभूमी', 'अछूत कन्या' सारखे चित्रपट केले आहेत.
  अशाप्रकारे प्रवाहाच्या विरुद्ध जात एक आगळंवेगळं क्षेत्र निवडत देविका राणी यांनी आपलं नाव इतिहासात अमर केलं आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Actress, Bollywood actress, Devika Rani Chaudhari, Entertainment, Lifestyle

  पुढील बातम्या