JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / मलायकाचं बाळ सहा वर्षांचं झालं; फोटोंवर होतोय शुभेच्छांचा वर्षाव

मलायकाचं बाळ सहा वर्षांचं झालं; फोटोंवर होतोय शुभेच्छांचा वर्षाव

मलायकानं नुकताच कॅप्सरचा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाचे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई**,** 16 फेब्रुवारी : प्रसिद्ध मॉडेल, अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. मात्र यावेळी मलायका स्वत:च्या फोटोंमुळे नव्हे तर आपल्या पाळीव कुत्र्यामुळं चर्चेत आहे. तिनं अलिकडेच आपल्या आवडत्या कुत्र्याचा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाचे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. मलायका एक डॉगी लव्हर आहे. कॅप्सर असं तिच्या कुत्र्याचं नाव आहे. मलायकाचं कॅप्सरवर प्रचंड प्रेम आहे. ती आपल्या मुलांप्रमाणेच त्याचा सांभाळ करते. अनेकदा ती आपल्या या लाडक्या कुत्र्याला घेऊन बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये देखील घेऊन जाते. कॅप्सरसोबतचे तिचे फोटो अनेकदा चर्चेचा विषय ठरतात.

संबंधित बातम्या

अवश्य पाहा - VIDEO: जॉनच्या मानेवर फुटली काच; सिनेमातल्या स्टंटबाजीत खरोखर झाला जखमी या सेलिब्रिटी कुत्र्याचा आज सहावा वाढदिवस आहे. मलायकानं आपल्या लाडक्या कॅप्सरचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. तिनं त्याच्यासाठी एका खास केकदेखील मागवला होता. या वाढदिवस सेलिब्रेशनचे फोटो तिने ईन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. “माझं बाळ आज सहा वर्षांचं झालं.” असं म्हणत तिने हे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी या फोटोंवर प्रतिक्रिया देत कॅप्सरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या