KGF 2
मुंबई**,29** जानेवारी: KGF Chapter 2 च्या प्रदर्शनाची तारीख आज अधिकृतरीत्या KGF2 च्या टीम कडून 6 वाजून 32 मिनिटांनी जाहीर करण्यात आली. KFG2 हा भारतीय सिनेसृष्टीतला बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. मागच्या वर्षी बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट तुफान चालला. आणि तेव्हाच त्याच्या मेकर्स कडून सिक्वेलची घोषणा करण्यात आली होती. आता 16 जुलै 2021 ला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. KGF Chapter 2 च्या टीमने ट्वीट करत लिहिलंय की,’ तारीख लक्षात ठेवा ! एकतर इतिहासाची पुनरावृत्ती होईल किंवा नवीन इतिहास लिहिला जाईल.
KGF Chapter 2 ची तारीख जाहीर झाल्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. सकाळपासूनच सगळे चाहते तारीख जाहीर होण्याची वाट पहात होते. संजय दत्तने याआधीच सकाळी ट्वीट करत लिहिलं होतं की,’वचन पाळले जाणार. आज संध्याकाळी 6 वाजून 32 मिनिटांनी KGF Chapter 2 च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाईल.”
केजीएफ चॅप्टर 1 (KGF Chapter 1) या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेला कन्नड अभिनेता यशच्या 34व्या वाढदिवशी या चित्रपटाच्या सिक्वेलचा टीझर रिलीज करण्यात आला होता. रिलिजनंतर आतापर्यंत या व्हिडिओला 16 मिलियन पेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
ह्या चित्रपटात यशसोबतच संजय दत्त, रविना टंडन आणि श्रीनिधी शेट्टी यांनीही या चित्रपटात भूमिका साकारलेल्या दिसत आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार या सिनेमात रवीना भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात तिची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.संजय दत्त हातात तलवार घेऊन पाठमोरा उभा दिसतोय. या 2 मिनिटं 16 सेंकंदांच्या टिझरने अनेक चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.