मुंबई 8 मार्च: अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) सध्या प्रचंड चर्चेत आहे. अलिकडेच तिनं ब्रिज कँडी रुग्णालयात आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला. करिनाच्या या दुसऱ्या मुलाची एक झलक पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक होते. वारंवार तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर याबाबत तिला विनंती देखील केली जात होती. अखेर तिनं चाहत्यांची उत्सकता अधिक न ताणता आपल्या बाळाचा पहिला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जागतिक महिला दिनाच्या मिनित्तानं (International Women’s Day) हे खास गिफ्ट तिनं आपल्या चाहत्यांना दिलं आहे. (Second Child First Photo) करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकत्याच जन्मलेल्या बाळासोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोद्वारे तिनं आपल्या चाहत्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा फोटो ब्लॅक अॅण्ड व्हाईट आहे. यात करीनाच्या खांद्यावर बाळ निवांत झोपलेलं दिसतंय. फोटोत बाळाचा चेहरा दिसत नसला तरी करीनाने पहिल्यांदा बाळासोबत हा फोटो शेअर केलाय. “असं काहीही नाही जे महिलांना अशक्य आहे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा” असं कॅप्शन तिनं या फोटोला दिलं आहे. शर्मिला टागोर नातवापासून दूर; का नाही पाहिला करीनाच्या दुसऱ्या मुलाचा चेहरा?
लॉकडाऊनमध्ये करीना कपूर हिच्या प्रेग्नेसींबाबत अनेक चर्चा समोर येत होत्या. करीना कपूर हिला रात्री मुंबईती ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर 21 फेब्रुवारी रोजी करीनाने गोंडस बाळाला जन्म दिला. सैफ आणि करीनाने सोशल मीडियाद्वारे याबाबत चाहत्यांना माहिती दिली होती. 2016 मध्ये तैमूरच्या जन्मानंतर यावर्षी लॉकडाऊनमध्ये करीनाना प्रेग्नेंट होती.