JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अभिनेत्री कंगना रणौतविरोधात दाखल होणार FIR, वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाचे आदेश

अभिनेत्री कंगना रणौतविरोधात दाखल होणार FIR, वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाचे आदेश

वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने अभिनेत्रीविरोधात एफआयआर दाखल करण्याचा निर्णय दिला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 ऑक्टोबर : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut)ची सध्या विविध कारणांसाठी चर्चा होत आहे. दरम्यान अभिनेत्रीबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने कंगना रणौत विरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. कंगना विरोधात दाखल केलेल्या एका याचिकेमध्ये याचिकाकर्त्याने असे म्हटले आहे की, हिंदू कलाकार आणि मुस्लीम कलाकार यांच्यात मतभेद निर्माण करत कंगनाने तिच्या ट्वीट आणि न्यूज चॅनेल्सवरील तिच्या वक्तव्यामधून द्वेष वाढवला आहे. धार्मिक द्वेष पसरवल्याचा आरोप अभिनेत्रीवर करण्यात आला आहे. यासंदर्भात आरोप करत याचिका दाखल करण्यात आली होती.

संबंधित बातम्या

दरम्यान या प्रकरणी आता वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने अभिनेत्रीविरोधात एफआयआर दाखल करण्याचा निर्णय दिला आहे. कंगनाविरोधात भादवी कलम 153(A), 295(A), 124, 34 IPC अंतर्गत FIR दाखल केली जाणार आहे. याप्रकरणी अभिनेत्रीची काय प्रतिक्रिया असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (हे वाचा- या अभिनेत्रींना सोशल मीडियावर केलं गेलं लक्ष्य, ट्रोलर्सना असं दिलं चोख उत्तर ) ही याचिका मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैयद यांनी दाखल केली आहे. याचिकेमध्ये असे म्हटले आहे की, कंगनाकडून सातत्याने बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपासून ते अगदी टीव्हीपर्यंत सर्व ठिकाणी ती बॉलिवूड विरोधात बोलत आहे. ती सातत्याने बॉलिवूडला नेपोटिझम आणि फेव्हरेटिझमच्या अड्डा असल्याचे बोलत आहे. याबाबत कंगना विरोधात याचिका दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानंतर अभिनेत्रीची चौकशी होण्याची शक्यता आहे. (हे वाचा- ट्रोल्सना कंटाळून आमिर खानच्या मुलीने दिली धमकी, नैराश्याबाबत केली होती पोस्ट ) अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर अभिनेत्री कंगना रणौतने नेपोटिझम, फेव्हरेटिझम, बॉलिवूडमधील स्टार किड्स, ड्रग प्रकरण इ. अशा अनेक वक्तव्याबाबत भाष्य केले आहे. बॉलिवूडमधील अनेकांना तिने लक्ष्य केले आहे. तिने ट्विटरच्या माध्यमातून त्याचप्रमाणे काही चॅनल्सना दिलेल्या मुलाखतींच्या माध्यमातून तिचे म्हणणे मांडले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या